दत्तात्रय नारायण धर्माधिकारी

जेष्ठ निरुपणकार व समर्थ संप्रदायाचे श्रद्धास्थान दत्तात्रय नारायण उर्फ अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म १४ मे १९४६ रोजी झाला. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराण्यात चारशे वर्षेपासुन समाजप्रबोधनाच्या कार्याची वंशपरंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव ‘शेंडे’असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने ‘धर्माधिकारी’अशी पदवी दिली.

अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले आहे. त्यांचे पिता नारायण विष्णु धर्माधिकारी हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ व प्रसिद्ध समर्थ दासबोधाचे निरूपणकार, अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती क्षेत्रात निरलसपणे कार्य करणारे नानासाहेब यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही अथक परिश्रम घेऊन, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्वांगीण पुरु षार्थाची ओळख त्यांनी, स्वत:ची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली. बैठकांच्या मौखिक निरूपणाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्यसंपन्न समाजनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे.

अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाने त्यांना डी लिट पदवी बहाल दिली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*