ग्रामपंचायतीपासून ते थेट दिल्लीपर्यंत पोहचलेल्या नेत्यांची माहिती

टावरे, सुरेश काशिनाथ

सुरेश काशिनाथ टावरे हे भिवंडी नगरीचे प्रथम महापौर व याच लोकसभा मतदारसंघामधून २००९ मध्ये खासदार म्हणुन निवडून आले होते. सामान्य जनतेपासून ते उच्चभ्रू लोकवस्तीमध्ये राहणार्‍या मतदारांना भेडसावणार्‍या समस्या मुळापासून सोडवणे हा त्यांच्या व्यक्तित्वामधील असाधारण असा […]

शेख, साबीर

शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून अखेर पर्यंत एकनिष्ठ असलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय तसंच शिवसेनेचा मुस्लिम चेहरा अशी ओळखले असणारे नेते म्हणजे साबीर शेख ! साबीर शेख यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे १५ मार्च १९४५ […]

हेमंत गोविंद

हेमंत गोविंद यांना स्वत:च्या लहानपणापासून समाजातील गरीब तसंच उपेक्षित जनतेची सेवा करण्याचे ध्येय बाळगले होते. वडिलोपार्जित राजकारणाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे राजकारणात सुरूवातीची काही पाऊले टाकणे त्यांना फारसे जड गेले नसले, तरीदेखील गोरगरीबांच्या मनामध्ये विश्वासाची व […]

हुलावळे, रामचंद्र

मुंबईमधील जेष्ठ कामगार नेते व राष्ट्रिय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस रामचंद्र हुलावळे हे कामगारांच्या आयुष्यातील सदैव तेवणार्‍या दीपस्तंभासारखे होते. मुंबई मधील गिराणी कामगार व त्यांच्या हजारो कुटुंबियांच्या व्यथा, वेदना, सुख, दुःख, व आकांक्षा ते प्रत्यक्ष […]

मोते, रामनाथ

नाशिक जिल्ह्यातील कुंभारी गावी जन्मलेल्या रामनाथ मोते यांनी ठाणे जिल्ह्यात उदरनिर्वाहासाठी येवून नावलौकिक मिळविले. आभ्यासवृत्ती, परिश्रम, व शिक्षण विकासाच्या आंतरिक तळमळीमुळे मोतेंनी दोन वेळा कोकण विभागाच्या शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रचंड मतधिक्याने जिंकली. कोकण विभागातच […]

फडणवीस, देवेंद्र गंगाधर

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झाल्यावर, महाराष्ट्र राज्याचे बावीसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची २८ ऑक्टोबर २०१४ या दिवशी पक्षातर्फे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.
[…]

चव्हाण, निलेश हरिश्चंद्र

निलेश चव्हाण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष आहेत. १८ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी या पदाची सूत्रे स्विकारली. ते “महाराष्ट्र नवनिर्माण सेने”कडून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीला उभे आहेत. माणसं जोडण्याची आवड आणि पारदर्शक व प्रामाणिक कामाची सवय या जोरावर त्यांनी लोकांमध्ये व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणले आणि “मनसेच्या ठाणे कार्यालयात गेल्यावर आपले काम होणारच” अशी भावना त्यांनी जनमानसात निर्माण केली. एका सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले निलेश चव्हाण हे व्यवसायाने स्थापत्य अभियंता (सिव्हील इंजिनिअर) आहेत त्यामुळे नागरी सुविधांच्या बाबतीत असलेला नियोजनाचा (प्लानिंग) अभाव त्यांना प्रकर्षाने जाणवतो.
[…]

शंकरशेठ, जगन्नाथ (नाना शंकरशेठ)

मुंबई शहराच्या विकासाचा पाया रचणार्‍या त्याचबरोबर मुंबई शहराच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थापनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणार्‍या जगन्नाथ नाना शंकरशेठ यांना आधुनिक मुंबईचा शिल्पकार मानण्यात आले आहे. […]

पाटील, शरद (कॉम्रेड)

प्राच्यविद्यापंडित, आंतरराष्ट्रीय विचारवंत आणि कृतीशील सामाजिक कार्यकर्ते म्हणुन ख्याती असलेल्या शरद पाटील हे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक होते.१९४५ मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथील शिक्षण अर्धवट सोडून कम्युनिस्ट चळवळीत त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
[…]

मधू दंडवते

हिंदी तसंच इंग्रजी अश्या दोन्ही भाषांवर असल्यामुळे दंडवतेंनी लोकसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला होता.आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ते ख्यातनाम होते.मधू दंडवतेच्या पत्नी प्रमिला दंडवते भारतातील समाजवादी चळवळीतील प्रमुख नेत्या होत्या.
[…]

1 5 6 7 8 9 14