बाळाजी बाजीराव

नानासाहेब व बाळाजी बाजीराव या नावांनी प्रसिद्ध

(१२ डिसेंबर १७२१-२३ जुन १७६१)

भट घराण्यातील तिसरा पेशवा (कारकीर्द – १७४०-६१). नानासाहेब व बाळाजी बाजीराव या दोन्ही नावांनी प्रसिद्ध असलेला पहिला बाजीराव व काशीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा.

जन्म मौजे साते (नाणे मावळ-पणे जिल्हा) येथे झाला. बाळाजीने चिमाजी आप्पा आणि अंबाजी पुरंदरे याच्या हाताखाली लहानपणी सातार्‍यात सर्व प्रकारचे शिक्षण घेतले. शाहू महाराजांसोबत तो मिरजेच्या स्वारीत १७३९ मध्ये होता.

पहिल्या बाजीरावाच्या मृत्यूनंतर – छत्रपती शाहुनी त्यास २५ जून १७४० रोजी पेशवाईची वस्त्रे दिली. मराठी राज्याचा कारभार पहावयाचा व राज्याबाहेरील हिंदुस्थानभर मराठी सत्तेचे वर्चस्व प्रस्थापित करावयाचे हे पेशव्याचे उद्दिष्ट होते.

# Balaji Bajirao Peshwe

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*