अभिनेत्री नेहा पेंडसे

अभिनेत्री

नेहाने झी मराठी वाहिनीवरील भाग्यलक्ष्मी ह्या मालिकेत काम करून अभिनयाची सुरूवात केली. त्यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९८४ रोजी झाला. मराठी तारका आता स्वतःची स्पेस व इमेज प्रमाणेच आपल्या ‘लुक’ बाबतही विशेष काळजी घेऊ लागल्या आहेत. नेहा पेंडसेही त्याला अपवाद नाही.

खंर तर, मराठीतील हॉट व बोल्ड अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते पण त्या प्रकारची कोणतीही भूमिका न साकारताही तिची तशी इमेज तर झाली आहे, असे तिला वाटते आणि त्याबाबत कसलीही तक्रार न करता ती ही इमेज अॅक्सेप्टदेखील करते. आपण व्हिज्युअल मिडियामध्ये असल्याने, येथे ‘दिसणे’ खूपच महत्वाचे आहे, त्यामुळे आपले लुक, फ्रेशनेस, कपड्यांची काळजी, आपली इमेज, हे सगळंच तितकेच महत्वाचे आहे, असे तिचे मत आहे.

चित्रीकरणाच्या एकूणच धावपळीतून, ‘जिम’मध्ये जायला मिळणे खूप गरजेचे आहे. एकंदरीतच प्रेझेंटेबल राहण्याकडे नेहा पेंडसेचे विशेष लक्ष आहे हे ठळकपणे स्पष्ट होते. तिने आजवर मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम व कन्नड चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

#NehaPendse

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*