गडचिरोली जिल्हा

घनदाट जंगले, विरळ लोकसंख्या अन्‌ त्यामुळे निसर्गरम्यतेबरोबरच अतीव शांतता हे गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य. गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्हयातील बर्‍याचशा ठिकाणी नागरी भागातील माणसांची पावले पोहोचलेली नाहीत. गडचिरोली म्हटलं की जंगलाबरोबरच आपल्या डोळ्यासमोर येतो तो आदरणीय बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला लोकबिरादरी प्रकल्प. डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी सौ मंदा आमटे हे हा प्रकल्प हेमलकसामधील नागेपल्ली, भामरागड येथे गेली ३५ वर्षे चालवत आहेत.
महाराष्ट्रात दोन जिल्हे ‘दारूबंदी’ जाहीर केलेले जिल्हे आहेत; एक आहे वर्धा अन्‌ दुसरा जिल्हा आहे गडचिरोली.