मराठी पुस्तकांतील निवडक उतारे..

विनोबा (महागुहेत प्रवेश)

मी नेहमी ‘यात्री’ मानसासंबंधी बोलतो. ईश्वर आपल्याजवळ आहे. त्याला दूर लोटून आपण ईश्वर-दर्शनासाठी बद्रीकेदारला जातो. तिथे गेल्यावर म्हणतो, आता काशीयात्रेला जाऊ. तिथून रामेश्वरला. म्हणजे, जो ईश्वर जवळ आहे त्याला दूर ढकलत राहतो. जसे हे ‘यात्री-मन’ […]

मीना प्रभु (तुर्कनामा)

मिडासची फ्रिजिअन भांडी आणि दागिने ठेवलेले होते. ग्रीकांच्या खूप जुन्या मायसीनियन संस्कृतीचेही हात इथं लागले होते. नंतरच्या हेलिनिस्टिक काळातल्या देवतांच्या पुतळ्याचं वेगळं खास दालनच आहे. तिथला इयूस, आफ्रोदोती वगैरेंचे पुतळे पाहताना आपण अथेन्सच्या म्युझिअममध्ये तर […]

मो. ग. तपस्वी (निवडक तपस्वी)

मार्च १९६८ चा प्रसंग. नाथांच्या अभ्यासिकेत आम्ही दोघेच परराष्ट्र धोरणावर बोलत होतो. नाथांचे वक्तृत्व पूर्ण विकसित फुलासारखे फुलले होते. तळमळ घेऊन एक एक शब्द उसळी घेत होता…‘आपल्या सरसीमेलगतच्या सर्व देशांना आपल्याबद्दलही संदेह आणि अविश्वास वाटतो […]

डॉ. द. ना. भोसले. (लोकपरंपरेतील नाग)

मानववंश शास्त्रज्ञांनी विभिन्न मानवी समुदायांचा अभ्यास करून मानवी समाजाची सहा धार्मिक प्रतिकांमध्ये विभागणी केली आहे. वृक्ष, लिग, सर्प, अग्नि, सूर्य आणि पितर ही ती सहा प्रतीके होत. मानवाने त्याची धार्मिक उपासना सुरू केली. त्यामुळेच वृक्षाची […]

वीणा गवाणकर (एक होता कार्व्हर)

मातीचे निरनिराळे नुमने जमवून त्यांची त्यांनी तपासणी केली होती. पण अलाबामाच्या मातीत दडलेलं रहस्य त्यांना सापडत नव्हतं. नेहमीप्रमाणे एके सुप्रभाती आपल्या ‘निसर्गदेवते’ला भेटून परतत असताना, विचारमग्न प्रा. कार्व्हरना समोरचं चिखलाचं डबकं दिसलं नाही. पाय घसरला. […]

अरुण गांधी (कस्तुरबा) अनु. – अरुण शौरी

माझ्या आजोबांनी ‘माझे सत्याचे प्रयोग’ या आत्मचरित्रात असे लिहिले आहे की, त्यांनी अहिसेची मूलतत्त्वे माझ्या आजीकडून शिकून घेतली. ती कधी आक्रमक नव्हती वा चूप बसून राहणारीही नव्हती. पण जे योग्य व न्याय्य आहे, ज्याच्याबद्दल तिची […]

कविता महाजन (ब्र)

माझे फायदे सगळे करून घेतले त्यानं. आजही करून घेतोय. माझं ऑफिस म्हणजे प्रसिद्धीखातं. तिथं सरसकट माझं नाव वापरून कामं करून घ्यायची. पुन्हा तुमच्या खात्यातल्या लोकांना दारू पाजावी लागते म्हणून ऐकवायचं. कधीकधी इतका संताप होतो ना…खूप […]

दुर्गा भागवत (ऋतुचक्र)

माघात दृग्गोचर होणारे हे काट्या-कुट्यांचे, उघड्या फांद्याचे दृश्य मनात अधिक भरते. केव्हा, तर या वठलेल्या झाडावरची गेल्या हंगामातील पक्ष्यांनी सोडलेली जुनी घरटी पाहून, या निर्जन घरट्याशिवाय मला तर माघ-फाल्गुनांतल्या निष्पर्णतेचा विचारच करता येत नाही. ही […]

ना. म. घाटे (श्रीयुत ईश्वर)

महात्माजींनी एकवीस दिवसांचा उपवास सुरू केला हे ऐकिल्यापासून मला जगाची, खुद्द हिंदुस्थान सरकारची व भावी हिंदवी स्वराज्याची फार काळजी वाटू लागली. म्हातारा जाणार असे माझ्या मुखातून नकळत उद्गार व डोळ्यांतून पाण्याचे दोन थेंबही निघाले होते. […]

सुनीता देशपांडे (प्रिय जी. ए. )

मलाही जुन्या अनेक गोष्टी आवडतात. पण त्या केवळ जुन्या आहेत म्हणून नव्हे, त्यांच्याशी लागेबांधे जोडले गेले आहेत म्हणून. मेणबत्तीपेक्षा मला पणती आवडते. (आता या गाढवपणाला काही अर्थ आहे का ? पण गाढवपणा निर्भेळ असला म्हणजे […]

1 3 4 5 6 7 23