मो. ग. तपस्वी (निवडक तपस्वी)

मार्च १९६८ चा प्रसंग. नाथांच्या अभ्यासिकेत आम्ही दोघेच परराष्ट्र धोरणावर बोलत होतो. नाथांचे वक्तृत्व पूर्ण विकसित फुलासारखे फुलले होते. तळमळ घेऊन एक एक शब्द उसळी घेत होता…‘आपल्या सरसीमेलगतच्या सर्व देशांना आपल्याबद्दलही संदेह आणि अविश्वास वाटतो आहे, तो दूर केला पाहिजे. हे संबंध व्यापाराचे, संस्कृतीचे आणि आर्थिक उन्नतीसाठी करावयाच्या प्रयत्नांसाठी असले पाहिजेत. अमेरिकेचा ट्रान्समिटर घेणे अगत्याचे असेल तर त्याची पर्वा न बाळगता तो घेण्याचे धैर्य दाखवले पाहिजे. आणि तो घेण्याचे हिताचे नसेल तर तसे स्पष्ट अमेरिकेला सांगून टाकण्याचेहि धाडस दाखविले पाहिजे. धरसोड कामाची नाही. एक दिवस अजीजी, दुसर्‍या दिवशी धिक्कार असला पोरखेळ परराष्ट्र व्यवहारात आपले हसे करतो आहे.

– मो. ग. तपस्वी (निवडक तपस्वी)