मराठी पुस्तकांतील निवडक उतारे..

पर्ल बक (भित)

शेवटी हे सारं त्याला असह्य झालं. त्याला वाटे, ‘मी इतका शिकलो सवरलो; ज्ञान मिळविलं; आणि ज्यांत कुणालाहि काडीचंसुद्धा ज्ञान मी देऊ शकत नाही असं शुद्ध हमालीचं काम मी करतो आहे ! हे माझेच देशबांधव खरे; […]

अनंत अंतरकर (बोलका बोका)

व्यवहारी माणसांनी बुजबुजलेल्या या दुनियेत सद्गुण आणि दुर्गुण यांची पुष्कळदा मोठ्या विचित्र रीतीने गल्लत आढळून येते. अमुक एक गोष्ट केल्यास ती सद्गुणांच्या साच्यात बसेल, की दुर्गुणात जमा होऊन अखेर शेवटी आपल्याला जगातून उठवून लावील, हे […]

वि. ग. कानिटकर (विन्स्टन चर्चिल)

विन्स्टन चर्चिल यांच्या ठिकाणी ही कला काहीशी आनुवांशिक आलेली होती. विन्स्टन यांच्या आईला चित्रे काढण्याचा नाद होता. या कलेकडे ओढले गेल्यानंतर त्यांनी हळूहळू खूपच प्राविण्य संपादन केले. त्यांच्या कल्पनाशक्तीला आवाहन करणारी, त्यांच्या ठिकाणच्या सौंदर्यदृष्टीला प्रोत्साहित […]

वि. ग. कानिटकर (विन्स्टन चर्चिल)

विन्स्टन इंग्लंडमध्ये सहजी परतले. परंतु त्यांचे राजकारणातील पुनरागमन इतके सोपे जाणार नव्हते. राजकारणात परतायचे तर दार्दानेल्सच्या शोकांतिकेत त्यांचा वाटा मोठा नाही, हे सर्वांना समजणे आवश्यक होते. विन्स्टन यांनी म्हणूनच परतल्या परतल्या पंतप्रधान अॅस्क्विथ यांच्याकडे, दार्दानेल्स […]

प्र. के. अत्रे (सन्त आणि साहित्य)

विनोबा किवा गाडगेबाबा हे वैराग्याचा किवा अध्यात्माचा प्रचार करणारे संत आहेत असा ज्यांचा कुणाचा समज झाला असेल तो त्यांनी आपल्या डोक्यातून आधी काढून टाकावा. जीवनाचा अत्यंत वास्तववादी आणि व्यवहारी दृष्टीने विचार करणारे हे दोघेही महान् […]

श्रीराम लागू (लमाण)

विजयाबाईंची ती अवस्था पाहून माझे पाणीपाणी झाले. वाटले, त्यांना जवळ घेऊन थोपटून धीर द्यायला पाहिजे. नाही तर त्या इथेच उभ्या कोसळतील. पण मी, ‘मी जिकलो मी हरलो’ या नाटकातला ‘माधव’ होतो. श्रीराम लागू नव्हतो ! […]

कृष्णाबाई मोटे (गिरणीतून आल्यावर)

वास्तविक या गिरणीवरून मी कितीदा गेले असेन. मोटारीने गेले आहे, पायी गेले आहे. त्याच्या सकाळी ७ वाजता होणार्‍या भोंग्यावरून माझे बंद पडलेले घड्याळ पण मी कितीकदा तरी लावले आहे. पण उंचच उंच दिसणार्‍या चिमणीशिवाय माझे […]

मारितेन

वस्तुनिष्ठ वाटणार्‍या कलाकृतीमधून ज्या पात्रप्रसंगाच्या व भाषेच्या माध्यमातून कलावंताचा अनुभव अभिव्यक्त होतो त्या सार्‍यातून कलावंताचे सर्जनशील मन स्पंदन पावत असते. त्या मनाच्या जाणीवा त्यांच्याद्वारे परिस्फुटित होत असतात. त्याला जाणवलेले मानवरूप व विश्वरूप भावित करण्यासाठी तो […]

भा. द. खेर (चाणक्य)

वसतिगृहाकडे परत येताना त्यांना अंधारातूनच यावं लागलं. त्याच अंधारातून वाट काढत तो तत्त्वज्ञानाच्या वर्गात जाऊन बसला. त्या कक्षात मशाली तेवत होत्या. अंधारातून वाटचाल करून आल्यामुळं त्याला मशालींचा तो प्रकाश पाहून बरं वाटलं. योगायोगाची गोष्ट अशी […]

सौ. ताराबाई साठे (अपराजिता रमा)

वडिलांच्या पाठोपाठ आईचा मृत्यू झाला. संकटे येऊ लागली म्हणजे एकटी दुकटी येत नसतात. कै. दे. ना. टिळक चरित्रात लिहितात. ‘पुनः प्रश्न आला प्रेतक्रियेचा. श्रीनिवासने बाबापुता करून कशी तरी दोन माणसे उभी केली. तिसरा श्रीनिवास व […]

1 2 3 4 5 23