प्र. के. अत्रे (सन्त आणि साहित्य)

विनोबा किवा गाडगेबाबा हे वैराग्याचा किवा अध्यात्माचा प्रचार करणारे संत आहेत असा ज्यांचा कुणाचा समज झाला असेल तो त्यांनी आपल्या डोक्यातून आधी काढून टाकावा. जीवनाचा अत्यंत वास्तववादी आणि व्यवहारी दृष्टीने विचार करणारे हे दोघेही महान् सत्पुरुष आहेत. अन्यायमूलक अशा अनंत भेदांनी आणि विषमतेने शतकानुशतके गांजलेल्या ह्या देशात ममतेच्या मार्गाने समता प्रस्थापित झाल्यावाचून येथील जनतेचे कल्याण होणे अशक्य आहे, असे या दोघांही महापुरुषांना वाटते.

– प्र. के. अत्रे (सन्त आणि साहित्य)