सुनीता देशपांडे (प्रिय जी. ए. )

मलाही जुन्या अनेक गोष्टी आवडतात. पण त्या केवळ जुन्या आहेत म्हणून नव्हे, त्यांच्याशी लागेबांधे जोडले गेले आहेत म्हणून. मेणबत्तीपेक्षा मला पणती आवडते. (आता या गाढवपणाला काही अर्थ आहे का ? पण गाढवपणा निर्भेळ असला म्हणजे झालं. त्याला अर्थ कशाला हवा ? बरोबर आहे ना ?) कुठल्याही देवापुढं माझे कधी चुकूनही हात जोडले जात नसले तरी गाभार्‍याचा वास मला आवडतो. तसाच बाळंतिणीच्या खोलीचा. गुराढोरांचा, शेतांचा, चुलीवरच्या भाकरीचा आणि असाच अनेक गोष्टींचा वास सहवास.


– सुनीता देशपांडे (प्रिय जी. ए. )