वीणा गवाणकर (एक होता कार्व्हर)

मातीचे निरनिराळे नुमने जमवून त्यांची त्यांनी तपासणी केली होती. पण अलाबामाच्या मातीत दडलेलं रहस्य त्यांना सापडत नव्हतं. नेहमीप्रमाणे एके सुप्रभाती आपल्या ‘निसर्गदेवते’ला भेटून परतत असताना, विचारमग्न प्रा. कार्व्हरना समोरचं चिखलाचं डबकं दिसलं नाही. पाय घसरला. कपड्यावर चिखलाचे शिंतोडे उडाले. आपल्या हातरुमालाने ते शिंतोडे साफ करू लागले. पण छे; डाग जायला तयार नाहीत. जरा जोर लावून पुसले. चिखल निघाला, पण डाग हटून बसले. त्यांच्या लक्षात आलं, कपड्यांवरचा चिखल साफ करता करता रुमालही रंगून निघाला होता. अगदी छान निळा रंग ! रुमाल धुऊन पाहिला. रंग हटेना. रुमाल लक्षपूर्वक तपासला. ‘‘धन्यवाद ! निसर्गदेवते, धन्यवाद ! माझं कोडं सोडवलंस !!!’’ सृष्टीदेवतेने त्यांच्यापुढे रहस्य उकलून ठेवलं होतं.

– वीणा गवाणकर (एक होता कार्व्हर)