गुप्ता, विजय राजेंद्रप्रसाद

जन्माने मराठी नसूनही महाराष्ट्राच्या मातीत मिसळून गेलेल्या काही उद्योजकांपैकी एक नाव, श्री विजय राजेंद्रप्रसाद गुप्ता. खरंतर यांचं महाराष्ट्रातलं योगदान  अतुनीय असं आहे. जन्म १५ मार्च १९७६ रोजी झाला..जन्मभूमी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, मात्र कर्मभूमी महाराष्ट्राचा आदिवासी भाग. तलासरीसारख्या औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या भागात राहून तिथेच शिक्षण घेतलं, वडिलांचा व्यवसाय सांभाळला. वाढवला आणि त्याचबरोबर स्वत:ही काही नवे व्यवसाय सुरु केले आणि या ग्रामीण भागाच्या उन्नतीलाही हातभार लावला. यामध्ये ट्रान्सपोर्ट, रिटेलिंग, किरकोळ विक्रीपासून सुरुवात करत त्यांनी आज कन्स्ट्रक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टील या उद्योगांमध्ये भरारी घेतली आहे. आता अपारंपारिक उर्जा-निर्मिती या क्षेत्रातही ते लवकरच पदार्पण करत आहेत. आज श्री विजय गुप्ता हे मुंबईच्या “विंध्यवासिनी ग्रुप”चे चेअरमन आहेत.

रिटेल उद्योगाच्या दोन दशकांहून जास्त अनुभवातून त्यांनी शहरात भिनलेल्या मॉल संस्कृतीचा अनुभव आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या जनतेलाही मिळावा या दृष्टीने पावले उचलली आहेत. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, तलासरी, बोईसर, डहाणू, पालघर वगैरेसारख्या ठिकाणी भव्य मॉल्स ते आता उभारत आहेत. एका जाहिरातीत आपण नेहमी ऐकतो.. “why should boys have all the fun?” त्याचप्रमाणे विजय गुप्ता हे नेहमी विचारतात… “why should only urban citizen have all the fun? ग्रामीण भागात रहाणार्‍यांनासुद्धा थोडी मजा करु द्या… ” हाच धागा पुढे नेत ते आता ग्रामीण मॉल्सची आणि त्याला जोडून मल्टिप्लेक्स सिनेमागृहांची साखळीच सुरु करत आहेत.

व्यावसायिक किंवा धंदेवाईक याच्या पलिकडे जाउन त्यांनी सामाजिक बांधिलकीचंही भान ठेवलं आहे. आपल्याकडे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना सोयी-सुविधा देण्यास सर्वसाधारणपणे सध्या सगळेच व्यावसायिक हात आखडता घेतात. मात्र विजय गुप्ता यांनी याबाबतीत एक वेगळा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न केला आहे. ठाणे जिल्ह्यातील वाडा येथे त्यांची स्टील मिल असून लवकरच रोलिंग मिलसुद्धा सुरु करत आहेत. इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे काम करणार्‍या कामगारांसाठी त्यांनी कारखान्याच्या आवारात स्वखर्चाने पक्की घरे बांधून दिली आहेत. याच भागात असलेल्या काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही अशा प्रकारची पावले उचललेली ऐकिवात नाहीत त्यामुळे विजय गुप्ता यांचे वेगळेपण तेथेही जाणवते.

व्यावसायिकतेबरोबरच सामाजिक कार्यातही ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. “सुशिलादेवी राजेंद्रप्रसाद गुप्ता चॅरिटेबल ट्रस्ट” या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक संस्था आणि उपक्रमांना वेळोवेळी मदत केली आहे. रोटरी सारख्या बर्‍याच सामाजिक संस्थांना त्यांनी मदत केली असून वापी येथील रोटरी हॉस्पिटलला अद्ययावत रुग्णवाहिकाही त्यांनी भेट दिली आहे. श्री विजय गुप्ता हे “विंध्यवासिनी देवी”चे निस्सिम भक्त असून त्यातूनच प्रेरणा घेउन डहाणूजवळच असलेल्या श्री महालक्ष्मी देवस्थानचे जिर्णौद्धाराचे कामही सध्या त्यांनी हाती घेतले आहे.

एवढं सगळं करुनही हा “मराठी माणूस” प्रसिद्धीच्या झोतात रमत नाही.. प्रसिद्धीपासून आतापर्यंत थोडा लांबच आहे हेही त्याचं वेगळेपण अधोरेखित करण्यासाखं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*