नातू, माधव

श्री माधव नातू हे ठाणे येथील ठाणे भारत सहकारी बॅंकेचे संचालक आहेत. श्री नातू हे ठाणे येथील नावाजलेले बांधकाम व्यावसायिक आहेत.

जोशी, उत्तम भास्कर

श्री. उत्तम जोशी हे ठाणे येथील ठाणे भारत सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष आहेत. ते ठाणे येथील उद्योजक असून ठाण्यातील अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे.

सुर्वे, नारायण गंगाराम

नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून समाजातील दलित व उपेक्षित वर्गामध्ये राहणार्‍या, व असंख्य वेदना निमुटपणे सोसणार्‍या जनतेचे आयुष्यभर अगदी समर्थपणे प्रतिनिधीत्व केले. […]

राऊत, नमिता

महिला सक्षमीकरणाचा नवा व समर्थ चेहरा म्हणून नमिता राऊत यांच्याकडे पाहिले जाते. महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले. महिला बचत गट स्थापन करून महिलांसाठीच्या हिताची कामे करण्यास सुरूवात केली. […]

सायन्ना, विठ्ठल

मुंबईच्या बांधकाम इतिहासामध्ये विठ्ठल सायन्ना यांचे नाव अत्यंत आदराने व गर्वाने घेतले जाते. ठाणे व मुंबईत विस्तीर्ण पसरलेल्या व वेगवेगळ्या आकारांनी, तसेच बांधकामाच्या शैलींनी नटलेल्या गगनचुंबी इमारतींचे, विस्तीर्ण जाळे विणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मुंबई व […]

वैद्य, सुधीर

सुधीर वैद्य हे भारतामधील अत्यंत प्रथितयश व सर्वपरिचीत असे व्यावसायिक संख्यातज्ञ, संकलक, व क्रिकेटविषयक चतुरस्त्र लेखन करणारे प्रतिभावंत लेखक आहेत. गेली ५० वर्षे भारतामध्ये व भारताबाहेर खेळवल्या गेलेल्या प्रत्येक कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा संपूर्ण […]

रिपोर्टर, पिल्लू

पिलू रिपोर्टर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुप्रसिद्ध पंच. ठाणे येथे स्तव्य असलेल्या पिलू रिपोर्टर यांनी १९८४-१९८५ च्या मोसमात कसोटी पंच म्हणून पदार्पण केले. आजगायत त्यांनी अनेक स्थानिक, व राष्ट्रीय सामने तसेच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामन्यांचे, त्यांच्या […]

वैती, अशोक

ठाणे महापालिकेचे माजी महापौर अशोक वैती यांच्या दमदार व खमक्या राजकीय नेतृत्वामुळे त्यांच्या कार्यकाळात ठाण्याचा झपाट्याने विकास झाला. महापौरपदी विराजमान झाल्यानंतर, या शहराचा आधुनिक व अद्ययावत पायाभुत सुविधांनी चौफेर विकास करण्याचा विडा उचललेल्या वैती यांनी […]

चव्हाण, निलेश हरिश्चंद्र

निलेश चव्हाण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष आहेत. १८ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी या पदाची सूत्रे स्विकारली. ते “महाराष्ट्र नवनिर्माण सेने”कडून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीला उभे आहेत. माणसं जोडण्याची आवड आणि पारदर्शक व प्रामाणिक कामाची सवय या जोरावर त्यांनी लोकांमध्ये व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणले आणि “मनसेच्या ठाणे कार्यालयात गेल्यावर आपले काम होणारच” अशी भावना त्यांनी जनमानसात निर्माण केली. एका सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले निलेश चव्हाण हे व्यवसायाने स्थापत्य अभियंता (सिव्हील इंजिनिअर) आहेत त्यामुळे नागरी सुविधांच्या बाबतीत असलेला नियोजनाचा (प्लानिंग) अभाव त्यांना प्रकर्षाने जाणवतो.
[…]

1 2 3 4 5 8