कांबळे, उत्तम

उत्तम कांबळे हे कुटुंबातील शिकलेली पहिली व्यक्ती. त्यांची आई शेतमजूर होती. घरात हालाखिचे दिवस होते. हातावर पोट चालणार घर
[…]

नाडकर्णी, ज्ञानेश्वर गणपत

वयाच्या नवव्या वर्षापासून अखंड वाचन आणि वयाच्या अठराव्या वर्षापासून अखंड लेखन अशी साधना करणारे लेखक आणि कलासमीक्षक ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी. कलासमीक्षा, साहित्यसमीक्षा आणि स्वत:चे लेखन यासाठी अठराव्या वर्षी हाती घेतलेली लेखणी नाडकर्णींनी ६४ वर्षे खाली ठेवली नाही. […]

राजूरकर, (डॉ.) न. गो.

न. गो. राजूरकर यांची म्हणावी तशी ओळख झाली नाही. ते हैदराबादचे रहिवासी असल्यामुळे कदाचित हे झाले असावे किंवा त्यांची बरीचशी ग्रंथसंपदा इंग्रजीत असल्यामुळे हे झाले असावे. डॉ. राजूरकर हे ख्यातनाम लेखक व वक्ते आहेत. त्यांनी इंग्रजीत आठ तर मराठीत पाच ग्रंथ लिहिले आहेत.
[…]

कुलकर्णी, (डॉ.) वा.म.

डॉ. वा. म. कुलकर्णी त्यांनी संस्कृतचे प्राध्यापक, महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाचे संचालक, एशियाटिक सोसायटीच्या म. म. पां. वा. काणे इन्स्टिट्यूटचे संचालक तसेच एशियाटिक सोसायटीच्या वाषिर्क जर्नलचे प्रमुख संपादक अशी अनेक महनीय पदे भूषवली होती. तरीही त्यांच्या उपजत ऋजुतेमुळे तसेच भिडस्त स्वभावामुळे ते प्रसिद्धीच्या झोतापासून कायम दूर राहिले
[…]

पुजारी, ऋचा

बुद्धिबळाच्या या खेळात अल्पावधीतच उत्तुंग झेप घेणाऱ्या ऋचा पुजारी या युवा खेळाडूचा मोठा वाटा आहे.
[…]

खोपकर, (कॉ) कृष्णा

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. कृष्णा खोपकर यांच्या राजकीय जीवनाचा आरंभ १९४२च्या भारत छोडो आंदोलनापासून झाला.
[…]

कोरगावकर भा. ल.

काही काही माणसांकडे दुसर्‍यांना थकवणारी अफाट ऊर्जा असते. असेच वरदान भा ल कोरगावकर यांनाही लाभले आहे. म्हणूनच तर आता वयाची पंचाहत्तरी गाठत असतानाही त्यांच्या डोक्यातल्या कल्पना आणि पायाला लागलेल्या भिंगर्‍या अखंड गरगरत असतात. […]

कुलकर्णी, गुरुनाथ

साठच्या दशकात बॅ. नाथ पै यांच्या विचारांनी गुरूनाथ कुलकर्णी यांना झपाटले होते. त्यामुळे भारावून त्यांनी देवगड तालुक्यात काम सुरू केले. एलएल.बी.च्या शिक्षणासाठी मुंबईत आल्यानंतर साम्यवादी विचारांचे त्यांना आकर्षण वाटले. पण मार्क्सच्या पोथीवादापेक्षा विविध क्षेत्रांतील लोकांत काम करण्याचा त्यांचा पिंड होता.
[…]

तिवाडी, चंदाबाई

संत एकनाथांनी समाजमनाची नस ओळखली आणि भारुडांच्या माध्यमातून समाजातील अपप्रवृत्तींवर हल्लाबोल केला. नाथांच्या याच सामाजिक प्रबोधनाचा वारसा सांगत चंदाबाई तिवाडी या लोककलावंत सध्या महाराष्ट्रभर भ्रमंती करत आहेत. भारुडाच्या माध्यमातून समाजातील दुष्प्रवृत्तींवर कडाडून हल्ला चढवत आहेत.
[…]

कांबळे, चेतन

चेतन जनार्दन कांबळे यांची आजवरची वाटचाल म्हणजे माहितीचा अधिकार, न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरचा संघर्ष अशा तिन्ही मार्गांनी झगडत राहणे. औरंगाबादच्या भावसिंगपुरा या खेड्यातील या तरुणाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या त्रिसूत्रीवर ठाम विश्वास आहे.
[…]

1 16 17 18 19