सुधीर भट
नाट्यनिर्माता संघाचा अध्यक्ष, नाटकांच्या तारखा आणि तिकीविक्री या विषयावर स्वतःची मते ठामपणे मांडणारा निर्माता म्हणून सुधीर भट यांची विशेष ओळख होती व राहील. त्यांनी गोपाळ अलगेरी यांच्या साथीने सुयोग या नाट्यसंस्थेची १ जानेवारी १९८५ मध्ये स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि एकहजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणार्या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली.
[…]
