वेंगसरकर, दिलीप

दिलीप वेंगसरकर यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ रोजी महाराष्ट्र राज्यात राजापूर येथे झाला. भारतीय क्रिकेट खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या काळात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शैली असलेले फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते. अतिशय तडाखेदार आणि उत्तम फटके मारणारे फलंदाज म्हणून ते गौरविले गेले होते. […]

तेंडुलकर, सचिन रमेश

क्रिकेट मधील एक चमत्कार म्हणून सचिन तेंडुलकरकडे पाहिलं जातं कारण फलंदाजीतलं कौशल्य, चिकाटी, खेळताना वापरलेलं तंत्र आणि सातत्य यांच्या सहाय्याने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसह वीस हजाराच्या वरती धावा करताना सचिनने अनेक विक्रम प्रस्थापित केले. सचिन तेंडुलकर याचा जन्म २४ एप्रिल, १९७३ रोजी मुंबई येथे झाला. […]

डहाके, वसंत आबाजी

कादंबरीकार, कवी आणि समीक्षक असलेले वसंत आबाजी डहाके हे सर्व महाराष्ट्राला साहित्यिक म्हणून परिचयाचे असले तरी एक वेगळा छंद त्यांनी आयुष्यभर जपला आणि तो म्हणजे चित्रकलेचा ! वसंत आबाजी डहाके यांचा जन्म विदर्भातला. यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथे ३० मार्च १९४२ रोजी त्यांचा जन्म झाला.
[…]

सई परांजपे

नाटककार, लेखिका आणि उत्कृष्ट नाट्यसिने दिग्दर्शिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या सई परांजपे यांची अजून एक महत्त्वाची ओळख म्हणजे बालसाहित्य लेखिका. एक वेळ प्रौढ साहित्य लिहिणे हे सहज शक्य असते मात्र बालसाहित्य हे तेवढेच अवघड काम. परंतु सई परांजपे हे अवघड काम आपल्या लेखणीद्वारे सहजतेने करून जातात आणि ते सहज असतं म्हणूनच सुंदर होतं. […]

राम शेवाळकर

अमोघ वाणी लाभलेला वक्ता, कवी, ललित लेखक, समीक्षक, विचारवंत ही ओळख राम शेवाळकर यांची. […]

विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)

एखाद्या गावाची ओळख त्या गावाच्या ग्रामदेवतेवरून होते. तसेच एखाद्या व्यक्तिमत्त्वामुळे गावाचे श्रेष्ठत्व वाढते. नाशिकला लाभलेले असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज.
[…]

भागवत, दुर्गा नारायण

एक विदुषी, तसेच लोकसाहित्य, बौद्ध वाङ्मय, समाजशास्त्र इ. विषयांच्या अभ्यासक आणि ललित लेखिका म्हणून अधिकाराने ज्यांचे नाव घेतले जाते त्या दुर्गा भागवत हे महाराष्ट्राला परिचित असेच नाव आहे. दुर्गाबाईंचा जन्म १० फेब्रुवारी १९१० रोजी इंदूर येथे झाला.
[…]

विनायक दामोदर सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकर)

उत्कट देशभक्त, जहाल क्रांतीकारक, तेजस्वी लेखक, कुसुमकोमल कवी, नाटककार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक असा एक माणूस या पृथ्वीतलावर होता. हे कुणाला खरे वाटणार नाही इतका स्वा. वीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे इंद्रधनुष्यासारखा शोभिवंत चमत्कार होता.
[…]

गायकवाड, सयाजीराव (महाराजा)

महाराजा सयाजीराव गायकवाड या नावाने ओळखले जाणारे प्रजाहितदक्ष, आदर्श असे नरेश. पूर्वाश्रमीचे ते गोपाळ काशीराम गायकवाड. अतिशय गरीब घरातला एक हुशार, चुणचुणीत मुलगा. १० मार्च १८६३ रोजी नाशिक जिल्ह्यातील कवणाणे येथे त्यांचा जन्म झाला.
[…]

गोखले, गोपाळकृष्ण

भारतातील सनदशीर चळवळीचे प्रणेते म्हणून नाव घेतलं जातं ते गोपाळकृष्ण गोखले यांचं. गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी कोकणातील चिपळूण तालुक्यातील कोतळुक या गावी झाला.
[…]

1 74 75 76 77 78 79