राम फाटक

मराठी गायक, संगीतकार रामचंद्र कृष्णाजी फाटक ऊर्फ राम फाटक यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९१७ रोजी झाला.

शिक्षणाने एम.ए., बी.टी. असलेल्या राम फाटकांनी काही वर्षे शिक्षकी पेशा पत्करला. पुढे १९५६ पासुन पुढील १० वर्षे नागपूर आकाशवाणी केंद्रावर तर त्यापुढील १० वर्षे पुणे आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. इथेच भास्करराव गोडबोलेआणि जे.एल.रानडे ह्यांसारख्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.

पुणे आकाशवाणी केंद्रावर असतानाच ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. सुधीर फडक्यांच्या गीतरामायणामधील काही गाणी ते गायले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी त्यांनी शास्त्रीय संगीत गायिका बेगम परवीन सुलताना यांच्याकडून काही मराठी भावगीते गाऊन घेतली.

रामभाऊंनी ’संतवाणी’ मधील ‘तीर्थ विठ्ठल’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘पंढरी निवासा’, ‘अणुरेणीया थोकडा’ हे पंडित भीमसेन जोशींकडून गाऊन घेतलेले अभंग खूपच लोकप्रिय झाले. ह्याबरोबरच ‘दिसलीस तू’, ‘डाव भांडून मांडून मोडू नको’ आणि ‘सखी, मंद झाल्या तारका’ ही सुधीर फडक्यांनी गायलेली भावगीते प्रचंड गाजली.

राम फाटक यांचे २६ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*