शास्त्रीय संगीताची परंपरा सांगणार्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात असं म्हटलं जातं की, “शरीर वीणा आहे” किंवा “गले में तंत और तंत में गला होना चाहिए !” नेमका हाच अमृतानुभव गेली ३५ वर्षं आपल्या सतार गायनातून समस्त ठाणेकरांना आणि संपूर्ण जगाला देणारे ज्येष्ठ सतार वादक मारुती पाटील हे ठाण्यातील रत्नांपैकी एक झळाळतं रत्न. १९७६ साली ठाणे पाहिलेल्या मारूती पाटील यांना तलावाचं हे शहर खूप अवडलं आणि ते ठाण्यात वास्तव्याला आले. १९९५ साली त्यांनी ठाण्यात ओंकार अकादमीची स्थापना केली. जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इस्राईल या देशातील संगीत विद्यालयात नियमितपणे अध्यापनाचे कार्य ते करत आहेत. ठाण्यातील प्रसिद्ध “वेव्हज म्युझिकल्स” चे मारुती पाटील संस्थापक आहेत. त्यांच्या कलेचा सन्मान आजवर “नादयोगी़”, “स्वरसाधना योगी”, “ठाणे गौरव” या पुरस्कारांनी सन्मानित करुन करण्यात आला आहे.
Leave a Reply