ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल 

तोरडमल, मधुकर - प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता

प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल  हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. तोरडमल यांना ‘मामा’ या नावाने संबोधले जायचे.

कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘आपली माणसं’, ‘आत्मविश्वास’, ‘शाब्बास सूनबाई’ हे मराठी चित्रपटही त्यांनी केले.

प्रा. मधुकर तोरडमल यांनी ‘ऋणानुबंध’, ‘किनार’, ‘गगनभेदी’, ‘गाठ आहे माझ्याशी’, ‘गुलमोहोर’, ‘झुंज’, ‘भोवरा’, ‘मगरमिठी’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’, ‘लव्ह बर्ड्‌स’, ‘विकत घेतला न्याय’ या नाटकांतूनही अभिनय केला होता.

तब्बल पाच दशकांहून अधिक काळ रंगभूमीच्या माध्यमातूनप्रेक्षकांना सतत हसवत ठेवणा-या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या त्यांच्या व्यावसायिक नाटकाने ५००० प्रयोगांची यशस्वी घौडदौड केली. तोरडमल स्वतः या नाटकात प्रोफेसर बारटक्क्यांची भूमिका करत. या नाटकाविषयी एका समीक्षकाने ठळकपणे म्हटले होते की, ‘सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषत: पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये’. पण झाले उलटेच. त्यानंतर रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला, मुली यांनी अक्षरश: रांगा लावून बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल केले.

धों. कर्वे यांनी लिहिलेल्या ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर त्यांनी केले होते. अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठी अनुवादही त्यांनी केला आहे. त्याशिवाय, २० पुस्तके लिहिली आहेत.
‘उत्तरमामायण’ या पुस्तकात त्यांनी आपल्या नाट्यविषयक आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या ‘तिसरी घंटा’ या आत्मचरित्राचा उत्तरार्ध म्हणायला हवा.

दि. २ जुलै २०१७ रोजी त्यांचे दिर्घ आजारपणामुळे मुंबईत निधन झाले.  मुत्यूसमयी ते ८५ वर्षांचे होते.

## Toradmal, Madhukar

## Madhukar Toradmal

तोरडमल, मधुकर – First published on 15 Dec 2010. updated on 2 July 2017

प्रा. मधुकर तोरडमल यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल (20-Jul-2017)

रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल (24-Jul-2017)

ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल (24-Jul-2021)

ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचा स्मृतिदिन (2-Jul-2021)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*