गणपतराव जोशी

शेक्सपिअरच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांतील नायकांच्या भूमिका अजोडपणे वठवणारे गणपतराव जोशी. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८६७ रोजी रत्नागिरी, राजापूर येथे झाला.

गणपतराव जोशी हे मराठी रंगभूमीवरील एक असामान्य नट. त्यांनी शाहूनगरवासी नाटक मंडळीची स्थापना १८८१ साली केली. तेव्हापासून ती मराठी रंगभूमीच्या गद्य शाखेतील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली.

चंद्रसेन (हॅम्लेट), झुंझारराव (ऑथेल्लो), मानाजीराव (मॅक्बेथ) आणि प्रतापराव (टेमिंग ऑफ द श्रू ) या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. अत्यंत सुरेल व असाधारण तेजस्वी आवाज हे गणपतरावांच्या अभिनयाचे प्रमुख वैशिष्ट्य होते.

राणा भीमदेव नाटकातील भीमदेव ह्या शूर योद्ध्याची भूमिका व तुकाराम व रामदास नाटकांतील अनुक्रमे तुकाराम वा रामदास यांसारख्या भगवद्‌भक्त संतांची भूमिका गणपतरावसारख्याच कौशल्याने वठवीत. इतकेच नव्हे, तर दातेकृत झोपी गेलेला जागा झाला (१९०९) ह्यासारख्या फार्समधील विनोदी भूमिकांतील त्यांची निपुणताही प्रेक्षकांना थक्क करणारी होती.

गणपतराव जोशी यांचे ७ मार्च १९२२ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*