क्रिडा विश्वात सामावणार्‍या प्रत्येकाची माहिती. क्रिकेट जरी भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असला तरीही इतर अनेक खेळात मराठी खेळाडू आपली मोहोर ऊठवत आहेत. त्यांच्याविषयी माहिती येथे मिळेल.

मंत्री, माधव

फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून क्रिकेटचे मैदान गाजवणावर्‍या माधव मंत्री यांचा जन्म १९२१ साली नाशिकमध्ये झाला होता. अत्यंत कडक शिस्तीचे क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाणारे माधव मंत्री यांनी १९४१ रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शालेय जीवनातच त्यांना क्रिकेटची गोडी लागली. तर १९५१ मधील इंग्लंड दौकर्‍यात त्यांना भारतीय संघात जागा पटकावली होती. 
[…]

हिंगणे, शिरीष वामन

लेखन आणि बुद्धीबळ ह्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविणारे ठाण्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे श्री. शिरीष वामन हिंगणे. “काय पाहिलस माझ्यात?”, “गंगुबाई नॉनमॅट्रीक” ह्या व अशा अनेक मालीकांत एपिसोड लेखन त्यांनी केले.
[…]

चव्हाण, दत्ता

मैदानी आणि मर्दानी हे दोन शब्द महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजले आहेत. त्यामुळे मराठी माणूस एकतर मैदानात मर्दूमकी गाजवतो नाहीतर मर्दानी छातीनं मैदान मारतो. असंच ठाण्यातलं एक व्यक्तीमत्व म्हणजे ४० वर्षं मैदानी खेळाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. दत्ता चव्हाण होय. […]

टिपणीस, यतिन

यतिन टिपणीस गेली २३ वर्षांपासून ठाणे जिल्हा टेबलटेनिस असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यभाग सांभाळत आहेत. त्याचप्रमाणे १२ वर्षांपासून महाराष्ट्र टेबलटेनिस असोसिएशनचे सह-सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. भारतीय टेबलटेनिस फेडरेशनच्या कार्यकारी समितीचे ते सदस्य आहेत.
[…]

नकवी, इशान

सांस्कृतिक वारसा लाभलेल्या ठाणे शहरास क्रीडापटूंची नगरी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन ह्या क्रीडाप्रकारात यश प्राप्त करुन इशान नकवी ह्याने ठाण्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव केला.
[…]

संन्याल, जिश्नू

जिश्नू संन्याल हे क्रिडाक्षेत्राला लाभलेलं ठाण्यातील रत्न असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळाद्वारे स्वत:चे व पर्यायाने ठाणे शहराचे नाव उज्ज्वल करणारे व्यक्तिमत्व आहे.
[…]

पाटकर, मधुरिका सुहास

ठाणे शहराला टेबल टेनिस मधील आंतरराष्ट्रीय पदकांच्या नकाशावर नेणारी ठाणेकर क्रीडापटू म्हणजे मधुरिका सुहास पातकर ही होय.
वयाच्या ७ व्या वर्षापासून तिने खेळास सुरुवात केली.
[…]

प्रभू, ममता अशोक

सन २००३ (पॅरीस) व सन २००५ रोजी (चायना) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिनं सहभाग घेतला. सन २००५ रोजी तिने पाकिस्तान येथील दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले.
[…]

पालांडे, मिनल संजय

लहानपणापासूनच कबड्डीची आवड असणार्‍या सौ. मिनल संजय पालांडे यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच कबड्डीसाठी झोकून दिलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला कबड्डी संघात त्यांनी सहा वर्षं महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व केलं आणि एक वर्ष कर्णधार म्हणूनही त्यांनी संघाचं नेतृत्व केलं.
[…]

केतकर, मुग्धा दिनेश

रिदमिक जिमनॅस्टिक या खेळात सहसा कुणी रस घेत नाहीत. परंतु ठाण्यातील मुग्धा केतकर हिने मात्र शालेय जीवनातच आपला मार्ग निश्चित केला आणि वयाच्या ९ व्या वर्षापासून राज्यस्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेत पदक मिळवायला सुरुवात केली.
[…]

1 2 3 4 5 6