विज्ञान-तंत्रज्ञान, इतिहास, भाषा, साहित्य, संस्कृती अशा विविध विषयांवर संशोधन करणार्‍या संशोधकांची माहिती.

वाडेकर, देविदास दत्तात्रेय

कोशकार आणि तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले देविदास दत्तात्रेय वाडेकर यांचा जन्म २५ मे १९०२ साली सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात कुरोली या खेडेगावात झाला. त्यांचे वडील राहुरी येथे प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण राहुरी येथे तर नगर येथे देविदास वाडेकर यांचे माध्यमिक शिक्षण झाले.
[…]

फाटक, नरहर रघुनाथ (न. र. फाटक)

इतिहास संशोधक आणि चरित्रकार हाच नरहर रघुनाथ फाटक यांचा महाराष्ट्राला परिचय. न. र. फाटकांचा जन्म १५ एप्रिल १८९३ सालचा. कोकणातील कमोद या गावाचे फाटकांचे घराणे. तेथून त्यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानातील जांभळी या गावी आले. […]

भाभा, (डॉ.) होमी जहांगीर

भारतातील अणुसंशोधन आणि अवकाश संशोधनाचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म मुंबई येथे ३० ऑक्टोबर १९०९ रोजी झाला. केंब्रीज विद्यापीठात भाभांचे उच्च शिक्षण झाले. भोर आणि रुदर फोर्ड या दोन शास्त्रज्ञांच्या हाताखाली शिक्षण घ्यायची संधी त्यावेळेस त्यांना मिळाली. […]

कर्वे, इरावती

समाजशास्त्र विषयातील संशोधक, मानववंश शास्त्राच्या एक तज्ज्ञ विचारवंत जगन्मान्य विदुषी, ललित निबंध लेखिका अशी कर्तृत्वान महिला म्हणजे इरावती कर्वे. […]

1 8 9 10