डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल, वास्तुविशारद यांसारख्या व्यावसायिकांची माहिती…

मुळाणे, सचिन

अस्सल महाराष्ट्रीय वडापाव आणि भारतीय खवय्येगिरीची आठवण देणारी कुल्फी, बर्फाचा गोळा या गोष्टींनी लंडनमध्येही धडक मारली. स्वस्त दरांच्या स्पर्धेला तोंड देत आपल्या गुगली रेस्तरॉंद्वारे नाशिकच्या सचिन मुळाणे या मराठी तरुणाने लंडनवासियांना अस्सल भारतीय लज्जतीने भुरळ […]

भोळे, विवेक

जळगावच्या विवेक भोळे यांनी वास्तुरचनाकार म्हणून भरारी घेताना मुंबई बरोबरच जयपूर, दिल्लीपासून चीनमध्येही कार्यालये थाटली. जगभर अनेक प्रकल्प तडीस नेले आणि वास्तुरचनेबरोबर इंटिरिअर डिझाइन, ग्राफिक डिझाइन या क्षेत्रातही काम केले… विवेक भोळे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या […]

चव्हाण, अभयसिंह

चित्रपट वितरण, साखर कारखाना, अर्थमूव्हिंग अशा व्यावसायिक क्षेत्रात जम बसत असतानाही कोल्हापूरच्या हिम्मतबहादूरांचा वारसा लाभलेले अभयसिंह चव्हाण अभ्यासाची शिडी चढू लागले आणि प्रशासकीय क्षेत्रात शिरण्याचा निर्धार त्यांनी केला. पण तेथे यशाने हुलकावणी देताच त्यांनी थेट […]

कोतवाल, (डॉ.) प्रकाश

दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील अस्थिरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश कोतवाल हे हातावरील शस्त्रक्रियेतील देशातले आघाडीचे शल्यचिकित्सक. त्यांनी हे नैपुण्य अमेरिकेतील केंटकी लुईव्हिलमधील हॅंडसर्जरीची संस्था आणि न्यूयॉर्कमधील हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथे मिळवले. आठ वर्षांपूर्वी […]

जाधव, (अॅडव्होकेट) शिवाजी

वकिलीत कार्यरत असलेल्या कुणालाही दिल्लीत जाऊन सुप्रीम कोर्ट पाहण्याची नेहमीच आस असते. मराठवाड्यातील वसमत तालुक्यात घडलेले अॅड. शिवाजी जाधव यांनी सुप्रीम कोर्टाच्या पायरीवर मराठी वकिली बाण्याचा दमदार आवाज पोहोचविला. सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडले […]

पुणेकर , नम्रता शशांक

त्वचारोगतज्ज्ञ असतानाही वेगळे काही करण्याची जिद्द बाळगून नम्रता शशांक पुणेकर यांनी अलंकारविक्री क्षेत्रात प्रवेश केला. पहिल्या सरकारी परवानाधारक महिला सुवर्णपारखी म्हणून लौकिक मिळविलेल्या नम्रता आता आयटी कंपनीच्या मालक आहेत. जळगावकन्येचा औरंगाबादेत आल्यानंतरचा हा प्रवास थक्क […]

पाटील, (डॉ.) प्रमोद – (पक्षीसंवर्धक आणि संशोधक)

पदवीने एमबीबीएस असणारे डॉ. प्रमोद पाटील यांनी पक्षीसंवर्धनाच्या क्षेत्रात पारदर्शी असे काम केले आहे. काळाच्या पडद्याआड जात चाललेल्या माळढोक पक्षाला वाचविण्याच्या कामात डॉ. प्रमोद पाटील यांच्या संशोधनाने मुख्य बळ मिळाले. निसर्गरक्षक गिधाडांना वाचविण्याच्या कामीही त्यांनी […]

टेपे, (डॉ.) दीपक

दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता व्हायला आवडेल, की जि.बी. पंत हॉस्पिटलचे संचालक? अशी विचारणा जागतिक कीर्तीचे कार्डियाक अॅनेस्थेटिस्ट डॉ. दीपक टेपे यांना केंद्र सरकरकडून अनौपचारिकपणे करण्यात आली.तेव्हा त्यांनी “मौलाना आझाद” च्या अधिष्ठाता पदाची निवड […]

बेडेकर (डॉ.) वासुदेव ना

डॉ. वा ना बेडेकर हे ठाणे शहरातील एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व. ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक असलेले डॉ. बेडेकर हे ठाणे शहराचे एक भूषण होते. […]

1 2 3 4 5 6 9