महाबळ, अल्हाद

Mahabal, Allhad

आल्हाद महाबळ हा ठाण्यामधील तरूण व प्रथितयश फोटोग्राफर आहे. निसर्गाचे जिवंत रूप व त्याच्या असंख्य लीला आपल्या कॅमेर्‍यामध्ये कैद करण्यापेक्षा त्याला आवड आहे.

कोणत्याही सजीव गोष्टीवरील सुक्ष्म भाव व भावनांचे टिपणं, आपल्या जिवापेक्षाही जास्त जपलेल्या कॅमेर्‍यात करण्याची गोडी त्याला लहानपणापासूनच होती.

व्यक्तींचे चित्रण हा त्याने आपल्या व्यवसायाचा भाग बनवला व या प्रातांतील सर्व बारकावे व कौशल्यांचा नीट आभ्यास करून ती सर्व कौशल्ये प्रयत्नपुर्वक त्याने आत्मसात केली. आज अनेक हिंदी, व मराठी मालिकांसाठी, सिनेमांसाठी, व मासिकांसाठी स्थिरफोटो काढणे, पोर्टफोलिओंसाठी लागणारी फोटोग्राफी करणे, व्यक्तींच्या विविध वैशिष्ट्यपूर्ण शारिरीक लकबींच शैलीदार चित्रण करणारी फॅशन फोटोग्राफी, एखाद्या वस्तूची प्रभावी जाहिरात करण्यासाठी लागणारी पब्लिसिटी फोटोग्राफी, कुठला तरी आशय किंवा संदेश देणारी सामाजिक फोटोग्राफी अशा अनेक निरनिराळ्या वाटा चोखंदळून आपल्यामधील सृजनशील व प्रयोगशील कलाकाराला त्याने भरगोस न्याय दिला आहे.

व्यक्तीच्या चेहर्‍यावर फोकस ठेवून त्या व्यक्तीच्या भावभावनांना अधोरेखित करणारी पार्श्वभुमी व छायाप्रकाशाचा खेळ रंगविला, तर त्या व्यक्तीचे एक चिमुकलं भावविश्वच पाहणार्‍यासमोर उलगडता येवु शकत हे त्याच्या फोटोजवरून प्रकर्षाने जाणवतं. आपल्या रोजच्या अनुभवांमधुन व अवती भवती घडणार्‍या प्रसंगांमधून तो त्याच्या व्यावसायिक फोटोग्राफीसाठी लागणारे दृष्यसंदर्भ घेत असतो. प्रकाश, अंधार, सावल्या व रंग या निसर्गाकडून मानवाला मिळालेल्या प्रेमपुर्वक भेटींना बोलत करून त्यांद्वारे रसिकांशी मनसोक्त संवाद साधण्याच त्याच स्वप्न, त्याचा हा व्यवसाय पूर्ण करत आहे.

फायनल युसेग डिपेन्डन्ट एक्सिक्युशन, गारमेन्ट शुट, इमोटीव्ह पोट्रेचर, या तांत्रिकदृष्ट्या महत्वाच्या संज्ञांमध्ये व प्रकारांमध्ये तो विशेष निपुण आहे. सध्या आल्हाद एम. फोटोग्राफी हा नामांकित फोटो स्टुडियो तो चालवित आहे. त्याने अनेक संस्थांमध्ये साहाय्यक फोटोग्राफरची, तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे प्रकल्प निवडून आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटविली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*