आकाश ठोसर

चित्रपट, वेब सिरीज अभिनेता

आकाश ठोसर हा मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी वेळात मोठं नाव कमावलेला अभिनेता आहे. त्याचा जन्म २४ फेब्रुवारी १९९४ साली जेऊर येथे झाला.

आकाश पहिले एक कुस्तीपटू होता. नंतर नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘ सैराट ‘ ह्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवलेल्या मराठी चित्रपटात त्याला मुख्य अभिनेता साकारण्याची संधी प्राप्त झाली. त्या चित्रपटात त्याने परश्या नामक पात्र साकारले होते. पुढे त्याने महेश मांजरेकर दिग्दर्शित FU (Friendship Unlimited) हा चित्रपट केला. हा चित्रपट २०१७ ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. २०१८ साली त्याने अनुराग कश्यप दिग्दर्शित lust stories ह्या web series मध्ये काम केले होते. ह्या web series मध्ये तो राधिका आपटे सोबत अभिनय करताना दिसला होता. आता लवकरच तो नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘ झुंड ‘ ह्या हिंदी चित्रपटात अभिनय करताना प्रेक्षकांना दिसणार आहे.

२०१९ सालात तो हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग सोबत ‘सेट वेट ‘ ह्या हेअरजेलच्या जाहिरातीत दिसला .

#Akash Thosar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*