तिवाडी, चंदाबाई

संत एकनाथांनी समाजमनाची नस ओळखली आणि भारुडांच्या माध्यमातून समाजातील अपप्रवृत्तींवर हल्लाबोल केला. नाथांच्या याच सामाजिक प्रबोधनाचा वारसा सांगत चंदाबाई तिवाडी या लोककलावंत सध्या महाराष्ट्रभर भ्रमंती करत आहेत. भारुडाच्या माध्यमातून समाजातील दुष्प्रवृत्तींवर कडाडून हल्ला चढवत आहेत.
[…]

कुलकर्णी, गुरुनाथ

साठच्या दशकात बॅ. नाथ पै यांच्या विचारांनी गुरूनाथ कुलकर्णी यांना झपाटले होते. त्यामुळे भारावून त्यांनी देवगड तालुक्यात काम सुरू केले. एलएल.बी.च्या शिक्षणासाठी मुंबईत आल्यानंतर साम्यवादी विचारांचे त्यांना आकर्षण वाटले. पण मार्क्सच्या पोथीवादापेक्षा विविध क्षेत्रांतील लोकांत काम करण्याचा त्यांचा पिंड होता.
[…]

कोरगावकर भा. ल.

काही काही माणसांकडे दुसर्‍यांना थकवणारी अफाट ऊर्जा असते. असेच वरदान भा ल कोरगावकर यांनाही लाभले आहे. म्हणूनच तर आता वयाची पंचाहत्तरी गाठत असतानाही त्यांच्या डोक्यातल्या कल्पना आणि पायाला लागलेल्या भिंगर्‍या अखंड गरगरत असतात. […]

खोपकर, (कॉ) कृष्णा

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. कृष्णा खोपकर यांच्या राजकीय जीवनाचा आरंभ १९४२च्या भारत छोडो आंदोलनापासून झाला.
[…]

वढावकर, आप्पा

नाट्य-सिनेसृष्टीमध्ये वढावकर हे आडनाव नवं नाही. आधी राम वढावकर यांच्या निमित्ताने त्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांचे पुत्र उज्ज्वल तथा आप्पा वढावकर यांनी ही जबाबदारी नेटाने आणि कौशल्याने पुढे नेली. […]

ओवळेकर, (अॅड) रमाकांत

ठाण्यातील नावाजलेल्या वकिलांमध्ये ज्येष्ठ अॅड. रमाकांत ओवळेकर हे सर्वांना परिचित होते. त्यांना आदराने अनेक जण ‘अण्णा’ म्हणत. कोर्टात युक्तिवादासाठी उभे राहिले की प्रतिवादी वकिलांना आता ‘अण्णा’ काय गुगली टाकतील याबद्दल उत्सुकता असे
[…]

अर्जुन उमाजी डांगळे

मराठी साहित्यक्षेत्रात मराठी साहित्यिकांसाठी उदंड पुरस्कार असले तरी अन्य भारतीय भाषांमधील लेखकाचा गौरव करणारा एकही पुरस्कार नाही. अशावेळी चेन्नईची बुकसेलर्स अॅण्ड पब्लिशर्स ऑफ साऊथ इंडिया ही संस्था तमिळेतर भाषेतील साहित्यिकांना एक लाख रुपयांचा घसघशीत पुरस्कार देते आणि त्या पुरस्कारासाठी मराठीतील ज्येष्ठ लेखक अर्जुन डांगळे यांची निवड झाली. त्यांच्या या समग्र जीवनभानाचा गौरव दक्षिणेतील ‘कला अय्यंगार’ पुरस्काराने झाला आहे. […]

फडके, अरुण

अरूण फडके हे ठाण्यामधील नावाजलेले शब्दकोशकार व व्याकरणतज्ज्ञ आहेत. […]

जोशी, गजानन दत्तात्रय

हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे पार्ल्यातील भाऊबीज कार्यकर्ते गजानन दत्तात्रय जोशी यांचा सुमारे ३६ वर्षांपूर्वी महर्षी कर्वे यांच्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेशी त्यांचा संबंध आला.
[…]

1 2