आडनावाबद्दलचा अभिमान, जिव्हाळा आणि प्रथा

आपले आडनाव कसेही असले तरी आपण ते जन्मभर मोठ्या अभिमानाने आपल्या नावासमोर लावतो. आपला समाज पुरूषसत्ताक आहे म्हणून मुलाच्या किवा मुलीच्या नावासमोर वडिलांचे किवा पतीचे नांव आणि वडिलांचे किवा पतीचेच आडनाव लावण्याची प्रथा आहे. हा वास्तविक स्त्रीजातीवर अन्याय आहे. विवाहानंतर अेखादी स्त्री ही कुणाची तरी मुलगी किंवा बहीण किंवा कुणाची आअी असे तिचे अस्तित्व न राहता ती अेका पुरूषाची पत्नी अेवढेच तिचे अस्तित्व शिल्लक अुरते. काही कर्तबगार स्त्रियांना हे पटत नाही, मानवत नाही म्हणून त्या लग्नानंतर माहेरचे आणि सासरचे अशी दोन्ही आडनावे लावतात. पण अशारितीने त्यांचा प्रश्न सुटला तरी त्यांच्या मुलांना मात्र वडिलांचीच आडनावे मिळतात.

समाजात जागृती होते आहे. काही व्यक्ती तर असे सुचवितात की आडनावाचा त्याग करून स्वतःचे नांव, आअीचे नांव आणि नंतर वडिलांचे नांव लिहूनच ती व्यक्ती ओळखली जावी. मुलगा झाला की आपला वंश चालू राहिला असे आपण मानतो. अेखाद्या जोडप्याला दोन किवा तीन मुलीच असल्या तरी ते जोडपे दुःखी असते. कारण काय? तर त्यांना वंशाचा दिवा म्हणजे मुलगा नाही. मुलगा नसला तर वंश खुंटला असे मानतात पण, मुलीला मात्र वंशाची पणती मानायला कुणी तयार नसतात. हे कितपत रास्त आहे?

— गजानन वामनाचार्य

2 Comments on आडनावाबद्दलचा अभिमान, जिव्हाळा आणि प्रथा

  1. kakade काकडे या आडनावाविषयी कृपया माहिती हवी 

  2. मला कोल्हे या आडनावाविषयी माहिती हवी आहे

Leave a Reply to kishore M.Kakade Cancel reply

Your email address will not be published.


*