मृगजळाच्या मागे धावत जाणं हे निरर्थकच

एक चिमणी आकाशात निवांत भरार्‍या मारत होती. उंचावर तरंगणार्‍या कापसासारख्या ढगांचा तिला हेवा वाटला. आणि त्याच्याबरोबर स्पर्धा करावी या विचाराने ती ढगाजवळ वरवर जाऊ लागली. ढगाजवळ पोहोचणार तेवढ्यात ढगाने आपली दिशा बदलली. चिमणी ढगापाठोपाठ जाऊ लागली. ती जवळ येताच ढग आकाशात अंतर्धान पावले. त्याला शोधण्यासाठी चिमणी पुन्हा इकडे-तिकडे भटकू लागली. तेव्हा खूप दूरवर तिला तो ढग दिसला. पण ढग आता तुकड्या तुकड्याने विखुरला होता. त्याच्या कोणत्या भागाशी स्पर्धा करावी हा विचार करीत चिमणी त्याच्यामागे धावू लागली. इतका वेळ उडल्यामुळे ती आता थकून गेली होती तरीही स्पर्धा करायची तिची ईर्षा तिला पुढे पुढे नेत होती. त्यामुळे उडत उडत थोडं का होईना ढगाच्या पुढे जाऊन दाखवायचेच यासाठी ती जेमतेम ढगापर्यंत पोहोचली असेल नसेल तोच ढग विरून गेला. हाती तर काहीच लागले नाही आणि एवढ्या धावपळीमुळे ती दमून जमिनीवर कोसळली.
तात्पर्य – मृगजळाच्या मागे धावत जाणं हे निरर्थकच.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.