बोधकथा

‘मी’ पणा संपल्यावरच ईश्वराचा शोध सुरू होतो

धनसंपत्ती, ऐश्वर्य सर्व मिळवून त्याचा उपयोग घेतल्यानंतर देवदत्ताला ईश्वरप्राप्तीची इच्छा झाली होती. त्याच्या मनात येत होते की आता आपल्याजवळ सर्व काही आहे. नाही तो फक्त ईश्वरच ! मग तो मिळवायलाच हवा. म्हणून तो भगवी वस्त्रं घालून स्वत:च्या वाड्याजवळच एक झोपडी बांधून राहू लागला. झोपडीच्या बाजूला एक मोठे तळे होते. एकदा ... >>>

भाषासौंदर्य

‘‘हो, आम्ही त्यांचे दुखणारे गुडघे का घेतले ? चार दिवसांकरिता घेतलेत. काळे, आम्ही असा विचार नाही करत. अहो एवढा मोठा कलावंत आहे, समाजाचं मनोरंजन करतो. तो कोणत्या समाजाचं मनोरंजन करतो ह्यावर काय अवलंबून आहे ? आपल्या वाट्याला नाही येत, म्हणून काय झालं ? तुमची दुखणी घेण्याची परमेश्वरानं आम्हाला जी देणगी ... >>>

वचनामृत

V-0027

विजांचा कडकडाट व मेघांचा गडगडाट चालू असता आकाशाकडे डोळे लाऊन बसणार्‍या आणि मेघातून पडलेल्या पाण्यावाचून दुसरे कोणतेही पाणी न पिणार्‍या चातकाप्रमाणे माणसाची निष्ठा असायला हवी, तरच ध्येय साध्य होण्यास मदत होते.
— स्वामी विवेकानंद

Jokes

सदाशिव पेठेतील कुलकर्ण्यांच्या पेट्रोल पंपावर :
  पुणेकर : ५ रू.चे पेट्रोल टाक रे..
  कर्मचारी(आश्चर्याने) : अरे बापरे…एवढे पेट्रोल टाकून कुठे दौरा आहे साहेबांचा ?
  पुणेकर : कुठे दौरा वगैरे नाही? मनात आलं कि असेच पैसे उधळतो मी.
  कर्मचारी जागेवर बेशुद्ध