सामना (१९७५)

१९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘सामना’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद होते, विजय तेंडुलकर यांचे. तर हा चित्रपट दिग्दर्शित केला होता, जब्बार पटेल यांनी. गावातील शाळा मास्तराची भूमिका साकारणारे आणि आपल्या तत्वांवर ठाम असणारे डॉ. श्रीराम लागू , खलनायक नेत्याच्या भूमिकेतील निळू फुले या दोघांची विरोधी जुगलबंदी या चित्रपटातून पहायला मिळते. या चित्रपटाला मराठीतल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, तर डॉ. श्रीराम लागूंना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून “राज्य शासनाचा पुरस्कार” देऊन गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.

चला तर मग पाहूया, सामना हा चित्रपट..

निवडक व्हिडिओज

नोस्टॅल्जिया

Follow on Facebook