परीसासारखी आलेली संधी सोडून दिली तर पुन्हा संधी मिळत नाही

पदयात्रा करीत असताना मनोहरपंतांना एका जंगलात एक व्यक्ती भेटली. तिच्या सर्व अंगावर लोखंडी साखळदंड होते. रस्त्याने चालत जाताना ती व्यक्ती रस्त्यातील प्रत्येक दगड उचलून हातात घेत होती आणि तो दगड अंगावरील साखळदंडाला लावून पहात होती. […]

तात्पर्य – मन आरशाप्रमाणे स्वच्छ असेल तर मानसिक शांती, सुख, समाधान लाभेल

अर्चनाला आज सकाळीच कॉलेजचे तास होते. घाईघाईनी ती स्वतःचे आवरत होती. वेणी घालायला ती आरशासमोर उभी राहिली. आरशात चेहरा स्पष्ट दिसेना तशी ती आईला म्हणाली, ‘‘आई, आपला हा आरसा खराब आहे बघ. त्यात चेहरा स्पष्ट […]

आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जे पटेल तेच योग्य असे समजून करावे

विश्वनाथांच्या गुरुकुलात अनेक शिष्य विद्यार्जनासाठी वास्तव्याला होते. विश्वनाथांना एक तरुण अशी उपवर कन्या होती. विश्वनाथांनी तिचा विवाह करायचे ठरवले. एक दिवस त्यांच्या मनात आले की, आपल्याच शिष्यांपैकी एकाला जावई म्हणून करून घ्यावा; पण सर्व शिष्यांमधला […]

कारण नसताना मनःस्ताप करून घेतला तर शरीरावर त्याचा परिणाम होणारच

एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हा जगावेगळा असतो. समाजात राहून सुद्धा तो दहा माणसांप्रमाणे वागू शकत नाही. सुरेंद्रचा स्वभाव असाच काहीसा होता. समाजात कोठे अन्याय झाला, कोठे अत्याचार झाला की तो अस्वस्थ होत असे आणि त्या प्रकरणाशी […]

व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा

रविवारचा दिवस होता. पाय मोकळे करावे म्हणून घराबाहेर पडलो. फिरता फिरता मुख्य बाजाराच्या रस्त्यावर आलो. रविवार सुट्टीचा दिवस त्यामुळे बरीच दुकानं बंद होती. रस्त्यावर रहदारी सुद्धा तुरळक होती. मी रमत गमत निघालो होतो. तोच कांही […]

कधी कोणाची नक्कल करू नये

एक शेतकरी होता. त्याने एक मांजर आणि एक गाढव पाळलं होतं. ते मांजर त्या शेतकर्याचं अतिशय लाडकं होतं. शेतकरी घरी असला की ते सतत त्याच्या मागे पुढे घोटाळायचं. कधी मांडीवर जाऊन बसायचं तर कधी वेगवेगळे […]

सत्याचा वाली परमेश्वर

गोविदा एका चांगल्या कुटुंबात जन्माला आलेला होता. पण लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे आपले व आईचे पोट भरण्यासाठी त्याला एका सरदाराच्या घरी चाकरी करावी लागली. गोविदाला त्या घरात घराची साफसफाई करणे, देवघर साफ करणे, पूजेची […]

करावं तसं भरावं

उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य डोक्यावर आला होता. एक वाटसरू आपल्या गांवाकडे चालला होता. दमलेल्या, थकलेल्या त्या वाटसरूची नजर एका डेरेदार आंब्याच्या झाडाकडे गेली. त्या झाडाची जमिनीवर चांगली सावली पडली होती. झाडाखाली थोडावेळ विश्रांती घ्यावी म्हणून […]

आपला हितैषि कोण ओळखले पाहिजे

आपल्या आवडत्या पोपटाला घेऊन राजा एकदा शिकारीला गेला. वाटेत तहान लागल्याने एका छोट्याशा धबधब्यावर थांबून राजा ओंजळीने पाणी पिणार तेवढ्यात पोपटाने हातावर चोच मारली. पाणी सांडून गेले. राजाने पुन्हा ओंजळ भरली पुन्हा पोपटाने तेच केले. […]

1 13 14 15