तात्पर्य – मन आरशाप्रमाणे स्वच्छ असेल तर मानसिक शांती, सुख, समाधान लाभेल

अर्चनाला आज सकाळीच कॉलेजचे तास होते. घाईघाईनी ती स्वतःचे आवरत होती. वेणी घालायला ती आरशासमोर उभी राहिली. आरशात चेहरा स्पष्ट दिसेना तशी ती आईला म्हणाली, ‘‘आई, आपला हा आरसा खराब आहे बघ. त्यात चेहरा स्पष्ट दिसत नाही.’’ आईने आरसा जवळ येऊन पाहिला. म्हणाली, ‘‘अर्चना, तसं नाही. आरसा खराब नाही त्यावर धूळ जमली आहे. ती धूळ स्वच्छ केली तर आरसा पुन्हा पूर्ववत होईल !’’आईने एका फडक्याने तो आरसा पुसून स्वच्छ केला आणि आपल्या मुलीच्या हातात दिला. आरसा स्वच्छ झाल्यावर त्यात अर्चनाचा चेहरा स्पष्ट दिसायला लागला. स्वच्छ प्रतिमा पाहून तिला बरे वाटले. भराभर आवरून ती कॉलेजला निघून गेली.
तात्पर्य – मन आरशाप्रमाणे स्वच्छ असेल तर मानसिक शांती, सुख, समाधान लाभेल.

Die rasche verbreitung der wissenschaftliche arbeit in word reformation wäre ohne die buchdruckerkunst nicht denkbar gewesen

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.