आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जे पटेल तेच योग्य असे समजून करावे

विश्वनाथांच्या गुरुकुलात अनेक शिष्य विद्यार्जनासाठी वास्तव्याला होते. विश्वनाथांना एक तरुण अशी उपवर कन्या होती. विश्वनाथांनी तिचा विवाह करायचे ठरवले. एक दिवस त्यांच्या मनात आले की, आपल्याच शिष्यांपैकी एकाला जावई म्हणून करून घ्यावा; पण सर्व शिष्यांमधला सर्वोत्तम शिष्य कोणता ? हे पाहण्यासाठी त्यांनी सर्व शिष्यांना बोलविले आणि सांगितले की, ‘‘तुम्ही कोणाच्याही नजरेस न पडता कोठूनही एखादी मौल्यवान वस्तू चोरून आणून मला दाखवायची. असे जो करेल त्याला मी जावई करून घेईन. सर्व शिष्य गुरुकुलातून बाहेर पडले. प्रत्येकाने मौल्यवान वस्तू चोरून आपल्या गुरुकडे आणून दिल्या. अपवाद फक्त सोमनाथाचा होता. तो काहीही न आणता विश्वनाथांच्या समोर उभा होता. विश्वनाथांनी त्याला त्याबद्दल विचारता त्याने उत्तर दिले, ‘‘गुरुवर्य, मी तुमची आज्ञा पाळू शकलो नाही म्हणून मला क्षमा करा. चोरी करू नये हे आपणच शिकवलंत. चोरी करताना कोणी पाहणार नाही अशी जागा कोठेही नाही. इतर कोणीही नसले तरी चोरी करतांना मी मला पाहणारच होतो.’’ त्याचे उत्तर ऐकून विश्वनाथ आनंदाने म्हणाले, ‘‘माझा जावई होण्यास तू एकटाच लायक आहेस.’’
तात्पर्य – आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जे पटेल तेच योग्य असे समजून करावे. 

It was a major watershed in the history of europe and is today still can you do my homework of domyhomework.guru celebrated as a public holiday in france

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.