परीसासारखी आलेली संधी सोडून दिली तर पुन्हा संधी मिळत नाही

पदयात्रा करीत असताना मनोहरपंतांना एका जंगलात एक व्यक्ती भेटली. तिच्या सर्व अंगावर लोखंडी साखळदंड होते. रस्त्याने चालत जाताना ती व्यक्ती रस्त्यातील प्रत्येक दगड उचलून हातात घेत होती आणि तो दगड अंगावरील साखळदंडाला लावून पहात होती. त्या व्यक्तीचा हा उद्योग बराच काळपर्यंत चालू होता. मनोहरपंत हे सगळं टक लावून पहात होते. त्यांना त्याच्या या कृतीचा अर्थ लागेना. शेवटी न राहून मनोहरपंतांनी त्यांना विचारले, ‘‘आपण हे काय करीत आहात ? काही शोधत आहात का ?’’ त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘‘हा दगड लोखंडाला लावून बघण्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे मी गेले बारा-पंधरा वर्षे परीस शोधतो आहे; पण अजून काही मला सापडला नाही.’’ हे ऐकून त्या व्यक्तीच्या बुद्धिची कीव करत तो मूर्ख आहे असं समजून मनोहरपंत चालू लागले. मधल्या काळात बरीच वर्षे गेली. पुन्हा एकदा त्याच रस्त्यावर मनोहर पंतांना ती व्यक्ती भेटली आणि त्यांना धक्काच बसला. त्या व्यक्तीच्या अंगावरील साखळदंड सोन्याचे होते; पण तरीही त्याच्या सर्व क्रिया मागीलप्रमाणेच होत्या. मनोहरपंतांनी विचारले, ‘‘अंगावरील साखळदंड तर सोन्याचे झाले आहे याचा अर्थ तुम्हाला परीस सापडला आहे. मग आता तुमचा शोध कशासाठी सुरू आहे ?’’ त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘‘जमिनीवरचा दगड उचलणे, साखळीला लावून पाहणे आणि टाकून देणे ही क्रिया सतत घडत राहिल्यामुळे परीस हातात आला कधी, तो साखळ्यांना लागून त्याचं सोनं झालं कधी हे मला कळलं सुद्धा नाही; आणि नेहमीप्रमाणे मी तो दगड टाकून दिला. आता टाकून दिलेला परीस मी पुन्हा शोधतो आहे.’’
तात्पर्य – परीसासारखी आलेली संधी सोडून दिली तर पुन्हा संधी मिळत नाही.

So now, instead of iron triangles, we have issue networks, which is a whole bunch of help with wisconsin essay prompt 2015 things mashed together

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.