रामचंद्र नरहर चितळकर (सी.रामचंद्र)

हिंदी तसंच मराठी चित्रपटसृष्टीतील विख्यात संगीत दिग्दर्शक व पार्श्वगायक असलेल्या सी.रामचंद्र यांचे मूळ नाव रामचंद्र नरहर चितळकर. ‘सी. रामचंद्र’ हे संक्षिप्त नाव त्यांनी सिनेदिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन धारण केले. आपल्या निकटवर्तीय व आप्तेइष्टांमध्ये ते ‘अण्णा’ या नावाने प्रसिद्घ होते.
[…]

फाटक, नरहर रघुनाथ (न. र. फाटक)

इतिहास संशोधक आणि चरित्रकार हाच नरहर रघुनाथ फाटक यांचा महाराष्ट्राला परिचय. न. र. फाटकांचा जन्म १५ एप्रिल १८९३ सालचा. कोकणातील कमोद या गावाचे फाटकांचे घराणे. तेथून त्यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानातील जांभळी या गावी आले. […]