सप्रे, उदय गंगाधर

उदय गंगाधर सप्रे हे व्यवसायाने तांत्रिक बाजूंवर काम करणारे अभियांत्रिक असले तरी आयुष्यभर विवीध कलांमध्ये बेधुंदपणे रमणारा, व हौशीपणाने प्रत्येक कलेमधील सुप्त सौंदर्याचा रसास्वाद घेणारा प्रतिभावंत कलाकार त्यांचा नेहमीच कानोसा घेत आलाय. बी. ई. केमिकल, व डीप्लोमा इन इंटेरिअर डिझाईन अँड डेकोरेशन ह्या पदव्या संपादन करणार्‍या सप्रे यांना लहानपणापासूनच विविध कलाकौशल्यांमध्ये झळकायची, व त्यांना पुर्णपणे आत्मसात करण्याची खुमखुमी होती. चित्रकला व उत्तम रंगसंगतींची जाण तसेच कुठलीही गोष्ट सुबक, रेखीव व उठावदार होण्यासाठी काय करावे लागते, याचे अचुक, उपजत ज्ञान त्यांच्यात मुबलक असल्यामुळे इंटेरिअर डिझाईनिंग व डेकोरेशन या वेगळ्या वाटेकडे वळण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला व तो यशस्वीही करून दाखविला.
[…]

केळकर, दिनकर गंगाधर

काव्यसंग्राहक – संपादक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुराणवस्तू संग्राहक असलेले दिनकर गंगाधर केळकर हे नाव ‘राजा दिनकर केळकर म्युझियम’ या संस्थेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असेच. त्यांचा जन्म १० जानेवारी, १८९६ रोजी झाला.
[…]