कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम

राजकीय नेते

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचा जन्म ८ जानेवारी १९४५ रोजी सांगली जिल्ह्यातील सोंसल या गावी झाला.

१९६१ साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले. १९६४ मध्ये अवघ्या २० वर्षाच्या वयात त्यांनी ‘भारती विद्यापीठ’ ही शैक्षणिक संस्था स्थापन केली.

वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, व्यवस्थापन, औषधीनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, कृषी, आर्किटेक्चर, विधी, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान इ. चा समावेश असलेल्या जवळपास सर्व मुख्य परंपरागत आणि उदयोन्मुख विद्याशाखांचे शिक्षण देणारी ६५ महाविद्यालये आणि संस्था, या विश्वविद्यालयाद्वारे चालविल्या जातात.

भारती विद्यापीठाने समाजातील वंचित घटकांमधील अनेक मुलींना दत्तक घेऊन त्यांना जवळ जवळ मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आहे.

पतंगराव कदम यांचे ९ मार्च २०१८ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी हा लेख वाचा

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*