डॉ.केशव बळिराम हेडगेवार (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक)

आरएसएस संस्थापक

डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांचा जन्म १ एप्रिल १८८९ रोजी झाला. डॉ. हेडगेवार यांनी तरुणपणात सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतलेला. शाळेत असताना त्यांनी – व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्‌’ चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते.

डॉक्टरांनी १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी (२७ सप्टेंबर, १९२५) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना स्थापन केली. राष्ट्रीय समाजाला संघटित करून राष्ट्राला परम वैभवाला न्यायचे हे संघटनेचे ध्येय ठरवून त्यांनी वाटचालीला आरंभ केला.

क्रांतिकार्यातील आपले जुने सहकारी सोबत घेऊन त्यांनी नागपुरात एका पडक्या वाड्यात संघाची पहिली शाखा सुरू केली. १९२५ ते १९४० या काळात, सतत १५ वर्षे डॉक्टर देशभर प्रवास करत होते.

भगवा ध्वज, गुरू, गुरूदक्षिणेची वेगळी संकल्पना, विचारांना मुख्य व व्यक्तीला गौण स्थान, सामूहिक निर्णय पद्धती, पूर्णवेळ कार्यकर्ता संकल्पना, दैंनदिन शाखा (बाल-तरुण-थोरांनी रोज संध्याकाळी खेळण्यासाठी, देशभक्तिपर गाणी म्हणण्यासाठी एकत्र जमणे), सभासद नोंदणी-अध्यक्ष-सचिव-संचालक मंडळ या प्रचलित पद्धतींना फाटा आदी वैशिष्ट्ये असलेली कार्यपद्धती डॉ. हेडगेवार यांनी रा. स्व.संघामध्ये रुजवली.

डॉ. हेडगेवार यांचे २१ जून १९४० रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

#DrKeshavBaliramHedgevar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*