डॉ. डी. वाय. पाटील (डॉ.ज्ञानदेव यशवंतराव पाटील)

राजकीय नेते

डॉ.ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात तुम्हा-आम्हाला परिचित असलेले नाव म्हणजे ‘डॉ.डी.वाय.पाटील यांचा जन्म. २२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापुर येथे झाला.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सुरु केलेली राजकीय कारकीर्द पुढे अनेक मोठमोठ्या पदांपर्यंत घेऊन गेली. कार्यकर्ता, महापौर ते अगदी राज्याचे राज्यपाल, असा विस्मयचकित करणारा प्रवास डॉ. डी. वाय पाटील यांचा आहे.

१९५७ ते १९६२ या काळात डॉ. डी. वाय. पाटील हे काँग्रेसकडून कोल्हापूरचे महापौर होते. १९६७ आणि १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार म्हणूनही निवडून गेले होते. डॉ. डी. वाय. पाटील हे २००९ ते २०१३ या काळात त्रिपुरा, तर २०१३ ते १०४ या काळात बिहारचे राज्यपाल होते. शिवाय, त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचाही काही काळ कार्यभार होता.

भारत सरकारने डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कार्याचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*