अमृता खानविलकर

मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री

अमृता खानविलकर हे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रींपैकी एक बहुचर्चित नाव आहे. तिने आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे.

अमृताचा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ रोजी पुण्यात झाला. तिने तिच्या चित्रपटाच्या कारकिर्दीची सुरुवात मराठी चित्रपटापासून केली. तो चित्रपट होता “गोलमाल” (मराठी). तिने ह्या चित्रपटात double role केला आहे. साडे माडे तीन , कट्यार काळजात घुसली , अर्जुन , आणि काशिनाथ घाणेकर सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात तिने आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवलं. ती फक्त मराठीच नाही तर हिंदी सृष्टीतही आपली कारकीर्द गाजवीत आहे. तिने नच बलिये च्या ७ व्या पर्वावर तिचे आणि तिच्या नवऱ्याचे नाव कोरलं. तिचे लग्न हिंदी मालिकासृष्टीतील कलाकार हिमांशू मल्होत्राशी २०१५ सालात झाले. २०१७ साली तिला Zee Talkies चा महाराष्ट्राची फेव्हरेट नायिका हा किताब मिळाला होता.

# Amruta Khanvilkar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*