आडनावाची खरोखर गरज आहे का ?

आडनावाची खरोखर गरज आहे का? आडनावे काय सांगतात? आडनाव सोडले तर काय बिघडते? विवाहानंतर महिलांनी कोणते आडनाव लावावे? सासरचे? की माहेरचे आडनाव सोडूच नये? की सासर-माहेरचे जोड आडनाव धारण करावे? कुलनाम, आडनाव, सरनेम, फॅमिली नेम, […]

मराठी आडनाव – भुरचंडी

माधव महादेव भुरचंडी, हे नाव, माझे मित्र श्री. ठोंबरे यांनी, सप्टेंबर 1982 मधे मला सांगितलं. त्याच बरोबर, भुरचंडी या आडनावाची कुळकथाही सांगितली. माझ्या आडनावकोशात अशी नोंद आहे. माणसाच्या स्वभावाच्या किंवा शरीराच्या गुणवगुणावरून अनेक आडनावं रूढ […]

मराठी आडनावे – रामनामे आणि मजली

भाभा अणुसंशोधन केन्द्रातील, अेक संशोधनाधिकारी, अशोक भिमाजी मजली या तरूणानं, त्यांच्या ‘मजली’ या आडनावाची कुळकथा सांगितली ती अशी :: त्याचं पूर्वीचं आडनाव ‘रामनामे’ असं होतं. खरं म्हणजे त्यापूर्वीचं आडनाव निराळंच होतं. कराडच्या आसपासच्या परिसरात त्यांचं […]

निवासदर्शक आडनावं – लेवेनहूक.

निवासदर्शक आडनावं रूढ होणं ही जगभराच्या आडनावांची प्रथा आहे. अँन्टोनी वॅन लेवेनहूक (Antoni Van Leeuwenhock, 1632-1723) या डच शास्त्रज्ञानं, लाल रक्तपेशी, अन्नपदार्थातील .. प्राण्यांच्या लाळेतील .. मानवी विष्ठेतील … सूक्ष्मजीवजंतू, साठलेल्या पाण्यातील सूक्ष्म प्राणी (protists), […]

मराठी आडनाव – गुळदगड.

गुळदगड हे आडनाव अैकल्याबरोबर आपल्या मनात विचार येतो की, या कुटुंबाचा, दगडासारख्या गुळाशी काहीतरी संबंध असावा. वैशिष्ठ्यपूर्ण किंवा विचित्र आडनावासंबंधी आपण असाच सरळसरळ संबंध लावतो. परंतू अशा आडनावांच्या कुळकथा वेगळ्याच असतात. त्या, त्या कुटुंबातील व्यक्तीकडून […]

आणखी काही गोमंतकीय आडनावं

आज आणखी काही गोमंतकीय आडनावं आढळली **च्यातिम :: कै. गजानन कृष्णनाथ, कै. रत्नकांत सीताराम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, श्री. विनायक गजानन च्यातिम (माहिम, मुंबअी) यांनी, गोमंतक दैवज्ञ ब्राम्हण समाज या संस्थेला देणगी दिली. च्यातिंम हे खरोखर वैशिष्ठ्यपूर्ण […]

काही गोमंतकीय आडनावं

मडगाव (गोवा) येथून,  ‘गोमन्त कालिका’ नावाचं मासिक प्रसिध्द होतं. त्यात दैवज्ञ ब्राम्हण समाजाची खूप माहिती प्रसिध्द होत असते. जगन्नाथ अुर्फ नाना शंकरशेट आणि नाथमाधव (द्वारकानाथ माधव पितळे, १८८२ ते १९२८ .. केवळ ४६ वर्षे) या […]

1 2