मराठी आडनावांचा अभ्यास हा अेक गहन विषय आहे. मराठी आडनावात असलेल्या विविधतेमुळे कित्येक वेळा विनोद, मनोरंजक किस्से आणि गमतीजमती निर्माण होतात. अशाच काही आडनावातील गमतीजमती येथे संकलीत केल्या आहेत. त्या त्या आडनावांच्या व्यक्तींनी, या गमतीजमतींचा आनंद, खेळीमेळीने घ्यावयाचा आहे, कारण त्या आडनावांची हेटाळणी करण्याचा मुळीच अुद्देश नाही.


मराठी आडनाव कोश

श्री. गजानन वामनाचार्य ! वय वर्षे ८२ फक्त !
 
भाभा अणुशक्ती केंद्रातून सेवानिवृत्त झालेले श्री. वामनाचार्य हे एक बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या लेखनाबरोबरच त्यांनी एक जबरदस्त छंद जोपासला.
 
मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याची त्यांना आवड निर्माण झाली. या छंदाला, त्यांच्या आडनावावरूनच, १९६३ च्या मे महिन्यापासून सुरूवात झाली. वामनाचार्य हे नांव मराठी वाटत नाही. तुम्ही मद्रासी वाटता, तुम्ही बंगाली वाटता, तुम्ही कानडी वाटता अशी मते प्रदर्शित व्हायला लागली.
 
विविध मराठी आडनावे आढळली ती त्यांनी लिहून ठेवायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून आडनावांचा संग्रह जो वाढतो आहे तो अजूनही वाढतोच आहे. आतापर्यंत ६० हजारांपेक्षा जास्तच आडनावे त्यांच्या संग्रही आहेत. या कोशामुळे मराठी आडनावांचे अनेक पैलू अभ्यासायला मिळतात.
 
मराठी आडनावांविषयी अनेक लेख त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांत आणि नियतकालिकात लिहिले आहेत.
 
श्री. गजानन वामनचार्य यांच्या या मराठी आडनावांच्या महा-संग्रहाचा कोश `मराठीसृष्टी’वर प्रकाशित करत आहोत. वाचकांकडून याचे स्वागत होईल अशी अपेक्षा आहे. आपल्या काही सूचना असल्यास जरुर कळवा. इथे असलेल्या अथवा नसलेल्याही आडनावांबद्दल आपल्याकडे अधिक माहिती असल्यास तीसुद्धा जरुर कळवा...      [पुढे वाचा..]
 

कुटुंबाला आणि पर्यायाने व्यक्तीला आडनाव असतेच असते. ही प्रथा जवळजवळ सर्वच देशात पाळली जाते. मराठी समाजही अपवाद नाही. आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी, कुटुंबांच्या आडनावांची प्रथा, मुळात रूढ झाली असावी..