माणसाची पारख त्याच्या रूपावरून नाही तर गुणांवरून करावी

बुद्धिदत्त राजाने आपल्या कर्तृत्वाने आपले साम्राज्य बरेच वाढवले होते. लढणार्या आपल्या शूर सेनापतीचे आणि सैनिकांचे त्याला अतिशय कौतुक आणि अभिमान होता. त्याच्या बरोबरीने त्याच्या राज्यातल्या आणि परराज्यातल्या विद्वानांबद्दल त्याच्या मनात अतिशय आदराची भावना होती. त्यामुळे विद्वानांना वेळोवेळी बोलावून तो त्यांचा आदर सत्कार करीत असे. पंडित सोमनाथाच्या विद्वत्तेची किर्ती राजापर्यंत येऊन पोहोचली होती. त्याचा सत्कार करण्यासाठी राजाने आदराने त्याला निमंत्रित केले होते. दरबारात आज सोमनाथाचा सत्कार होणार होता. त्याच्यासाठी दरबार भरवण्यात आला होता. पंडित सोमनाथाचे दरबारात आगमन होताच त्याला बघून सर्व दरबार हसू लागला. पंडित सोमनाथ दिसायला अतिशय कुरूप होता. इतकेच नव्हे तर तो अष्टवक्रही होता. त्याची ही विद्रुपता पाहून दरबारी लोकांबरोबर राजाही हसू लागला होता. सर्व दरबार हसतो आहे म्हणून पंडित सोमनाथही हसू लागला. त्याचे हसणे बघून राजाला आश्चर्य वाटले. तेव्हा राजाने त्याला हसण्याचे कारण विचारले. सोमनाथानी उलट राजालाच प्रश्न केला, ‘‘हा सर्व दरबार का हसतो आहे ?’’ त्यावर दरबारातील पंडित म्हणाले, ‘‘आम्हाला तुझ्या विद्रुपतेचे हसू येते आहे.’’ हे ऐकून पंडित सोमनाथ म्हणाला, ‘‘महाराज, आपल्या दरबारी अनेक विद्वान पंडित आहेत असं मी ऐकलं होतं; पण इथे तर माझ्या चामड्याची परीक्षा करणारे सर्व चर्मकारच दिसत आहेत. या सगळ्यांनी आणि आपणही फक्त माझ्या रूपावरून माझे मोजमाप केले हे पाहून दुःख झाले.’’ त्याचे हे शब्द ऐकून सर्व दरबार खजिल झाला.
तात्पर्य – माणसाची पारख त्याच्या रूपावरून नाही तर गुणांवरून करावी.

Durch bestechung https://ghostwriter-hilfe.com/ und morde gelang es, den einfluss von staat und recht zurückzudrängen

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.