गर्वाचे घर खाली

तुकारामाच्या नावेतून अनेक लोक अनेकदा प्रवास करीत. या गावाहून त्या गावाला जाण्यासाठी तासभर तरी लोक त्याच्या नावेत असत. दिवसाकाठी अनेक प्रवाशांना तो नावेतून घेऊन जात असे. त्यामुळे मानवी स्वभावाच्या अनेक छटा त्याने पाहिल्या होत्या. एक दिवस एक विद्वान प्राध्यापक त्याच्या नावेतून प्रवास करीत होते. त्यांनी तुकारामाला विचारले,‘‘काय रे, तुला गणित येतं का ?’’ तुकाराम अर्थबोध न होऊन म्हणाला,‘‘गणित म्हणजे काय ? ते काय असतं ?’’ त्यावर प्राध्यापक महाशय म्हणाले,‘‘मूर्खा, तुला गणित म्हणजे काय हे माहीत नाही म्हणजे तुझं पंचवीस टक्के आयुष्य वाया गेलं. थोड्यावेळाने त्यांनी तुकारामाला विचारले,‘‘अरे तुला ज्योतिष कळतं का ?’’ त्यावर तुकारामाने ‘नाही’ अशी मान हलविली. हे पाहताच प्राध्यापक म्हणाले, ‘‘तुझ्यापुढे कमालच झाली. जो माणूस गणित शिकलेला नाही, ज्योतिष जाणत नाही तो जीवन काय जगणार ? तुझं अजून पंचवीस टक्के आयुष्य वाया गेलं.’’ ही चर्चा सुरू असताना आकाशात गडगडाट होऊ लागला. जोरात पावसाला सुरुवात झाली. नाव पाण्यावर हेलकावे खाऊ लागली. कोणत्याही क्षणी ती पाण्यात बुडेल असे वाटत असताना तुकारामाने प्राध्यापकाला विचारले, ‘‘सर, तुम्हाला पोहता येतं का ?’’ प्राध्यापकांनी त्यावर ‘‘नाही’’ असे उत्तर दिले. त्यावर नदीत उडी मारता मारता तुकाराम म्हणाला, ‘‘सर, मग तर तुमचं शंभर टक्के आयुष्य वाया गेलं. मला पोहता येतं. मी पाण्यात उडी मारून पैलतीरावर जाईन. :: राहिला वाचलात तर आपली गणितं सोडवत रहा. नाहीतर स्वतःचेच भविष्य बघा.’’
तात्पर्य – गर्वाचे घर खाली.

Add in the cream and whisk you can try there buy essay cheap until the eggs look foamy and light

12 Comments on गर्वाचे घर खाली

Leave a Reply

Your email address will not be published.