आपण सदैव बांधलेले आहोत अशा भ्रमात न राहता मुक्त होऊन जगले पाहिजे

काही बेलदार लोक म्हणजे गाढवाचे व्यापारी व्यवसायानिमित्त आपली गाढवं घेऊन दुसर्या गावाला जात होती. संध्याकाळी त्यांनी एका झाडाखाली आपला मुक्काम ठेवला. सकाळपासून गाढवं बरोबरीने चालत होती पण आता रात्रभरात ती इकडेतिकडे जाऊ नयेत म्हणून त्यांना बांधून ठेवणं आवश्यक होतं. त्यासाठी तो व्यापारी आसपास दोरी शोधू लागला. पण अशा माळरानावर दोरी कुठे मिळणार ? व्यापार्याने एक युक्ती शोधून काढली. त्याने आपल्या बरोबरच्या मुलाला सांगितले, ‘‘सगळी गाढवं एकत्र कर आणि त्यांना दोरीने बांधतो आहे असा अभिनय कर.’’ हातात दोरी नसताना गाढवं कशी बांधली जातील असा त्या मुलाला प्रश्न पडला. पण मालकाने सांगितले तसे त्याने केले. सकाळी उठल्यावर गाढवांवर सामान लादायचे म्हणून तो एकेका गाढवाला ओढू लागला पण गाढवं पाय पुढे टाकेनात, जागची हालेना. तेव्हा तो मुलगा गाढवांना मारू लागला. ते पाहून मालक म्हणाला, ‘‘अरे, तू त्यांना दोरीने बांधलं होतं ते सोडवलंस का ?’’ त्यावर मुलगा म्हणाला, ‘‘त्यांना मी बांधलं कोठे ? फक्त बांधायचा अभिनय केला.’’ त्यावर मालक म्हणाले, ‘‘तू जसा बांधण्याचा अभिनय केला तसा आता सोडण्याचा अभिनय कर.’’ मुलाने तसे केल्यावर गाढवे पुढे चालायला लागली.
तात्पर्य – आपण सदैव बांधलेले आहोत अशा भ्रमात न राहता मुक्त होऊन जगले पाहिजे.

Knowing exactly what’s around you can be https://pro-academic-writers.com/ overwhelming

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.