गुरुची महती

भारतीय संस्कृतीत गुरुपरंपरेला खूप महत्त्व आहे. मातृदेवो भव । पितृदेवो भव । आणि आचार्यदेवो भव! म्हणजेच माता-पिता आणि गुरु यांचे स्थान प्रत्येकाच्या जीवनात परमेश्वराइतके अनन्यसाधारण असते.’ कोणताही कलावंत हा परमेश्वराखालोखाल आपल्या गुरुलाच मानत असतो. गुरु म्हणजे ईश्वर अशीच प्रत्येक परम भक्ताची भावना असते. तरीही गुरुची आवश्यकता अपरिहार्य असते कां? असा प्रश्न एका शिष्याने रामकृष्ण परमहंसांना विचारला. तो म्हणाला, ठाकूरजी, शिष्याच्या जीवनात गुरुचे कार्य, स्थान काय असते? गुरुपासून लाभ कोणता?” रामकृष्ण म्हणाले, ‘ ‘ती समोर दिसणारी होडी पाहिलीस? आपल्या या आश्रमापासून कलकत्यास पोहोचण्यास त्या होडीला किती वेळ लागेल?” शिष्य म्हणाला लागतील चार तास. ” रामकृष्ण म्हणाले, ‘ ‘पण समज, ही आपली होडी एका मोठ्या बोटीला जोडली तर?” शिष्य म्हणाला, ‘ ‘तसं झालं तर आपण फक्त अर्ध्या तासात कलकत्त्याला पोहोचू ” रामकृष्ण म्हणाले, ‘ ‘गुरुची महती अशीच आहे बेटा. ध्येय प्राप्तीच्या प्रवासात आपल्या जीवन नौकेला गुरुरूपी बोटीची जर शक्ती लाभली तर जी प्रगती करण्यास शिष्याला वर्षानुवष्रे लागतात, ती गुरुच्या कृपेने सहज व चटकन प्राप्त होते. ‘

तात्पर्य : जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शनार्थ गुरु हवाच!

1 Comment on गुरुची महती

Leave a Reply

Your email address will not be published.