पारख

सैनगुप्त नावाचा राजा होता. सेनगुस राजा विद्वानांचा पूजक होता. तो इतर राज्यातील विद्वानांना आपल्या राज्यात आमंत्रित करून त्यांचा मानस्मान, सत्कार करीत असे. तसेच आपल्या राज्यातील विद्वानांशी त्यांची चर्चा घडवून आणत असे. जेणे करून आपल्या राज्यातील विद्वान लोकांना जगाचे ज्ञान प्रास व्हावे, विचारांचे आदान … प्रदान व्हावे. त्यामुळे आपल्या राज्याचे वैचारिक वैभव वाढावे असा त्याचा उद्देश होता. परिणामी गावोगावांहून विद्वान त्याच्या दरबारात येत, सन्मानित होत आणि समाधानाने सेनगुप्त राजाचे कौतुक करीत परत जात. सेनगुप्ताच्या या भूमिकेमुळे विशाखानगरचा लौकिक दिवसेंदिवस वाढत होता. एकदा असाच एक विद्वान क्रषिकुमार विशाखानगरात
आला होता. त्याचा सत्कार करण्यासाठी दरबार! भरविण्यात आला. क्रषिकुमार विदूप होता. हातपाय वाकलेले, मान दुगदुगत असलेली अशा त्या क्रषिकुमाराली पाहून सारा दरबार, सारे लोक हसू लागले. राजाही हसूलागला. तसा तो क्रषिकुमारही हसू लागला. ते पाहून मात्र राजाला नवल वाटले. राजाने त्याला त्याबद्दल विचारले. तेंव्हा त्या क्रषिकुमारानेच उलट राजाला विचारले, ” ‘आपल्यासह दरबारातले हे सारेजण का हसत आहेत?” त्यावर एक विद्वान म्हणाला, ‘ ‘आम्हाला तुझ्या कुरूप शरीराकडे पाहून हसू आले. ” हे ऐकून क्रषिकुमार राजाला म्हणाला, ‘ ‘महाराज! आपल्या दरबारी मोठी विद्वान मंडळी आहेत, असं मी ऐकलं होतं. पण इथं तर चामड्याची परीक्षा करणारी
मंडळी दिसताहेत, ज्या साऱ्यांनी आणि आपणही माझ्या केवळ बाह्य रूपावरून माझी परीक्षा केलीत. अशा या विद्वानांची कवि येऊन मी हसत होतो. ” हे त्यांचे उत्तर ऐकून मात्र सारेजण ओशाळले. ‘

तात्पर्य : माणसाची पारख त्याच्या गुणावरून करावी, रूपावरून नव्हे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.