पु. ल. देशपांडे (असा मी असामी)

दुकानदार चिडत नाही. कारण तोही बिचारा नवरा असतो. त्याची बायकोदेखील खरेदीला गेली की त्याची हीच अवस्था करते. आणि नवर्‍याच्या दुकानातून ती कधीही साड्या नेत नाही. तुम्ही कधी कापडवाल्याची बायको त्याच्या दुकानात खरेदीला आलेली पाहिली आहे ? मी नाही पाहिली. आणि खरोखरच एखाद दिवशी अमुक अमुक आणि मंडळींची मंडळी आपल्या यजमानांच्या दुकानात आलीच खरेदीला, तर – ‘‘तुमच्यापेक्षा त्या लोकमान्यात कितीतरी व्हरायटी आहे.’’ असे नवर्‍याच्या तोंडावर सांगून लुगड्याच्या ढिगाखाली त्याला गाडून निघून जाईल. स्त्रीस्वभाव स्त्रीस्वभाव म्हणतात तो हाच ! तो समजावून घेण्यात निम्मं आयुष्य निघून जातं.

— पु. ल. देशपांडे (असा मी असामी)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.