वि. वा. शिरवाडकर (समिधा)

ईश्वराने त्याची इच्छा सफल केली. स्वर्गात शोभण्यासारख्या सुंदर फुलांनी पारिजातक बहरून गेला. जणू असंख्य स्वप्नांचा थवाच त्याच्या फांद्यावर येऊन बसला होता ! परिमलाच्या द्वारा त्याच्या वैभवाचे वृत्त सार्या रानात पसरले. सर्व वृक्ष त्याच्यापुढे नम्र झाले. त्यांनी पारिजातकाचा जयजयकार केला. पारिजातकाने डोळे उघडले. आपले अतुल वैभव त्याच्या दृष्टीस पडले. त्याची ग्लानी उतरली. तो आवेशाने उद्गारला, ‘‘मी तापसी आहे ! मला हे वैभव काय करायचे ?’’ आपल्या देहावर बहरलेली ती सारी संपदा त्याने खालच्या धुळीत टाकून दिली.

— वि. वा. शिरवाडकर (समिधा)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.